केविन कॉस्टनर एक अमेरिकन अभिनेता, चित्रपट निर्माता आणि संगीतकार आहे. (Kevin Costner) केविनचा जन्म १८ जानेवारी १९५५ रोजी कॅलिफोर्निया येथे झाला. केविनने १९८१ रोजी ‘सिझल बीच’ (Sizzle Beach) चित्रपटाद्वारे पदार्पण केले. मात्र हा चित्रपट १९८१ पर्यंत प्रदर्शित झाला नाही. म्हणून १९८६ मध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. त्यामुळे १९८३ रोजी आलेला ‘द टच’ (The Touch) हा त्याचा पहिला चित्रपट मानला जातो.
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : अरविंद केजरीवाल अयोध्येला जाण्यासाठी उत्सुक; निमंत्रण आले नाही तरी २२ जानेवारीला सह परिवार जाणार)
‘नो वे आऊट’ चित्रपटामुळे मिळाले स्टारडम
१९८२ ला आलेल्या ‘नाइट शिफ्ट’ (Night shift) या चित्रपटात त्याने लहानशी भूमिका केली होती. ‘नो वे आऊट’ या चित्रपटामुळे त्याला स्टारडम मिळाले. बुल डरहम आणि फील्ड ऑफ ड्रीम्स या चित्रपटाने त्याला चांगले यश मिळवून दिले. त्याचबरोबर द अनटचेबल्स, जेएफके, प्रिन्स ऑफ थीव्स, द बॉडीगार्ड, अ पर्फेक्ट वर्ल्ड, वोल्व्ह्स हे त्याचे इतर गाजलेले चित्रपट.
उत्कृष्ट मुख्य अभिनेत्याचा प्राइमटाइम एमी पुरस्कार
२०१२ ला आलेल्या हॅटफिल्ड्स (The Hatfield) आणि मॅककॉईज लघु मालिकांमध्येही तो झळकला. त्यासाठी त्याला उत्कृष्ट मुख्य अभिनेत्याचा प्राइमटाइम एमी पुरस्कार (Emmy Award) मिळाला. त्याला दोन अकादमी पुरस्कार, तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार, एक प्राइमटाइम एमी पुरस्कार आणि दोन स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड पुरस्कार आणि विविध पुरस्कार मिळाले आहेत. २०१५ मध्ये त्याने ‘द एक्सप्लोरर गिल्ड: अ पॅसेज टू शंभाला’ या पुस्तकासाठी सहलेखन केले. (Kevin Costner)
हेही पहा –