पद्म भूषण पुरस्कार प्राप्त अभिनेते, दिग्दर्शक, गायक आणि संगीतकार S Balachander

206
एस. बालचंद्र एक सुप्रसिद्ध आणि बहुआयामी कलाकार होते. तामिळ चित्रपटांमध्ये त्यांनी प्रचंड नाव कमावलं. मात्र वयाच्या ६३ व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांना एक्झिट घ्यावी लागली. सुंदरम बालचंद्र (S Balachander) हे अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, गायक आणि विणा वादक होते.
एस बालचंद्र (S Balachander) यांचा जन्म १८ जानेवारी १९२७ रोजी मद्रास येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सुंदरम अय्यर आणि आईचे नाव पार्वती उर्फ चेल्लम्मा… सुंदरम अय्यर यांनी पापनासम सिवन आणि मैलापूरमधील इतर अनेक संगीतकारांना खूप मदत केली होती. त्यामुळे त्यांचे प्रस्थ मोठे होते.
बालचंद्र (S Balachander) यांनी बालकलाकार म्हणून १९३४ मध्ये सीता कल्याणम या तमिळ चित्रपटात काम केले. विशेष म्हणजे या चित्रपटात त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी अभिनय केला होता. बालचंद्र यांनी रावणाच्या दरबारातील बाल संगीतकाराची भूमिका केली. त्यांचे वडीलांनी जनक राजाची भूमिका साकारली. १९४१ मध्ये ऋषिश्रृंगार आणि १९४२ मध्ये अरैचिमाणी या चित्रपटात ते झळकले.
पुढे एन कनावर या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी १९४८ ला केले. १९५४ मध्ये अंधा नाल हा थ्रिलर चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. त्यांनी अनेक चित्रपटांचे संगीत देखील केले आहे आणि गाणी सुद्धा गायली आहे. १९८२ रोजी त्यांना पद्म भूषण पुरस्कार प्राप्त झाला. १९९० मध्ये म्युझिक टूरवर असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.