मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराला सुरुवात झाली आहे. तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह इथं दहशतवादी आणि सुरक्षा दलामंध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला. तर त्याआधीही जवानाच्या मृत्यूची बातमी समोर आली होती. पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार शहीद झालेल्या जवानाचं नाव तखेलंबम सैलेशवोर असं आहे. तर शहीद झालेल्या पहिल्या जवानाच नाव वांगखेम सोमोरजीत असे असून ते पोलीस कमांडो होते. सोमोरजीत हे इंफाळ जिल्ह्यातील मालोम येथील रहिवासी होते. मोरेहममध्ये संशयित कुकी दहशतवाद्यांनी सुरक्षादलाच्या एका वाहनावर हल्ला केला. या हल्ल्यात इंडियन रिझर्व्ह बटालियनचे दोन जवान जखमी झाले. (Manipur)
(हेही वाचा : Badlapur MIDC Fire : बदलापूर येथील कंपनी मध्ये भीषण स्फोट ; चार ते पाच कामगार गंभीर जखमी)
मणिपूरमध्ये ३ मे २०२३ रोजी सुरू झालेल्या हिंसाचारात १८० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. हा हिंसाचार थांबला असं वाटत असतानाच मणिपूर पुन्हा पेटलंय. मणिपुरमध्ये हिंसाचाराची एक नवीन घटना समोर आली आहे.या घटनेनंतर मुख्यमंत्री सचिवालयात तातडीची बैठक बोलावली. यात मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्या सह मंत्रीमंडळातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी मोरेह शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला केला. याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिलं. कुकी दहशतवाद्यांनी मोरेह जवळ असलेल्या एका सुरक्षा चौकीवर बॉम्ब हल्ला केला.यांनतर पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली. पण या हल्ल्यात पोलिसांच्या वाहनांच आणू इतर वाहनाच नुकसान झाल. (Manipur )
हेही पहा –
Join Our WhatsApp Community