Ayodhya Ram Mandir : मंदिराच्या गर्भगृहात आज रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना होणार

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी मंगळवार १६ जानेवारी पासून सुरू झाली असून रामलल्लाची मूर्ती आज म्हणजेच गुरुवार १८ जानेवारी रोजी मंदिरात आणण्यात आली आहे. मुख्य सोहळा २२ जानेवारीला भव्य मंदिरात होणार आहे, परंतु 16 जानेवारीपासून समारंभाला सुरुवात झाली आहे.

224
Ayodhya Ram Mandir : मंदिराच्या गर्भगृहात आज रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना होणार

श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र (Ayodhya Ram Mandir) ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, २३ जानेवारीपासून राम मंदिर सामान्य लोकांच्या दर्शनासाठी खुले केले जाईल. “सध्या संपूर्ण देश राममय झाला आहे. भगवान रामाच्या जीवनाची व्याप्ती, त्यांची प्रेरणा आणि श्रद्धा भक्तीच्या पलीकडेही विस्तारलेली आहे. भगवान राम हे सामाजिक जीवनात सुशासनाचे प्रतीक आहेत,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मूर्तीची गर्भगृहात होणार स्थापना – 

विवेक सृष्टी ट्रस्टच्या ट्रकमधून रामललाची मूर्ती (Ayodhya Ram Mandir) राम मंदिरात नेण्यात आली. मंदिराच्या आवारात मूर्ती नेण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज गुरुवारी (१८ जानेवारी) ही मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात येणार आहे. आता ही मूर्ती मंदिरातील गर्भगृहाच्या दारात नेण्यात आली आहे.

(हेही वाचा – Ajit Pawar : प्रत्येक विभागाने केंद्राचा अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करा)

मान्यवरांची भाषणे, कलाकार, साहित्यिक, अभियंते, प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमंत्रण –

प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Ram Mandir) विधीप्रसंगी गाभाऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्रचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, सर्व विश्वस्त तसेच विविध परंपरेतील दीडशेहून अधिक संत-महंत उपस्थित राहतील. कार्यक्रमानंतर मान्यवरांची भाषणे होणार आहेत. खेळाडू, वैज्ञानिक, राजदूत, साहित्यिक, कलाकार, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी यांना सोहळयाचे आमंत्रण देण्यात आले आहे. याखेरीज मंदिर उभारणीच्या कामात सहभागी असलेले अभियंते व कामगारही सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्यासाठी आठ हजार खुर्च्याची व्यवस्था करण्यात आली आहे. (Ayodhya Ram Mandir)

(हेही वाचा – Manipur : मणिपूर मध्ये पुन्हा हिंसाचार ; दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शाहिद)

मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान –

मानसरोवर, गंगोत्री, हरिद्वार, अमरनाथ, प्रयागराज, नर्मदा, गोदावरी, गोकर्ण अशा विविध स्थळांवरून अभिषेकासाठी जल आणल्याचे राय यांनी सांगितले. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी विविध ठिकाणांहून जल, मृदा, सोने, चांदी, वस्त्रे आली आहेत. कार्यक्रमापूर्वी नागरिकांनी स्थानिक मंदिरांमध्ये स्वच्छता करावी तसेच प्राणप्रतिष्ठा झाल्यावर शंखध्वनी करावा व प्रसाद वाटप करावे, असे आवाहन राय यांनी केले आहे. (Ayodhya Ram Mandir)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.