Ayodhya Ram Mandir : डोंबिवलीत ६२ हजार ५०० पुस्तकांपासून साकारले श्रीराम मंदिर

डोंबिवली एक सांस्कृतिक परिवार, डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल ६२हजार ५०० पुस्तके रचत राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

249
Ayodhya Ram Mandir : डोंबिवलीत ६२ हजार ५०० पुस्तकांपासून साकारले श्रीराम मंदिर

डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलातील बंदिस्त सभागृहात लायब्ररी, डोंबिवली एक सांस्कृतिक परिवार, डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल ६२हजार ५०० पुस्तके रचत राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. बुधवारी (१७ जानेवारी) सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या मंदिराचे कलश पूजन करण्यात आले. (Ayodhya Ram Mandir )

भारतातील पहिले बहुभाषिक पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन १९ ते २८ जानेवारी दरम्यान सावळाराम महाराज क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आले आहे. डोंबिवलीत वाचन संस्कृती आणि धर्म संस्कृती एकत्रपणे गुण्या गोविंदाने नांदते.या वर्षी श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत होत असताना पुस्तके हेच दैवत असणाऱ्या अनेक वाचकांना भावेल असे पुस्तकरूपी मंदिर बांधण्याची संकल्पना पुंडलिक पै यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासमोर मांडली.मंदिर संपूर्ण उभं करायला ३० दिवस लागले असून मंदिर ५० फूट उंच८० फूट रुंद ४० फूट लांब आहे.  (Ayodhya Ram Mandir )

(हेही वाचा : Ayodhya Ram Mandir : मंदिराच्या गर्भगृहात आज रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना होणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.