२२ जानेवारीला होणाऱ्या ऐतिहासिक राम मंदिर प्रतिष्ठापन सोहळ्यासाठी अयोध्या सज्ज झाली आहे. ‘प्राणप्रतिष्ठा’ समारंभाच्या अधिक कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. जवळपास अयोध्येला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शहरातील सुरक्षा वाढवण्यासाठी उत्तर प्रदेशचे दहशतवादविरोधी पथक १६ जानेवारी रोजी अयोध्येत तैनात करण्यात आले आहेत. चौका चौकात कमांडो तैनात करण्यात आले आहेत. (Ayodhya Ram Mandir)
उत्तर प्रदेश पोलिसांनी ३६०-डिग्री सुरक्षा कवच प्रदान करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI Technology) आधारित अँटी-माइन ड्रोन देखील सादर केले आहेत. ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज प्रशिक्षित सुरक्षा दलांच्या देखरेखीखाली अयोध्या मध्ये आहे. अयोध्येत राम लल्लाच्या ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्यासाठी ७ दिवसांचे वैदिक विधी १६ जानेवारीपासून सुरू झाले. राममंदिराच्या अभिषेक सोहळ्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ दिवसांच्या धार्मिक उपक्रमाला सुरुवात केली.
(हेही वाचा : Ayodhya Ram Mandir : डोंबिवलीत ६२ हजार ५०० पुस्तकांपासून साकारले श्रीराम मंदिर)
एटीएसचे मुख्यालय राजधानी लखनौ येथे आहे. राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फील्ड युनिट्स देखील तयार करण्यात आल्या आहेत. जिथे ऑपरेशनल एटीएस कमांडोजच्या अनेक तुकड्या आहेत. ऑपरेशन टीम्स आणि फील्ड युनिट्सना अचूक आणि आवश्यक सहाय्य देण्यासाठी इतर विशेष युनिट्स ATS मुख्यालयात कार्यरत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community