ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानी एसीबीकडून (ACB Raid) झाडाझडती सुरु झाली आहे. रत्नागिरी मधल्या निवासस्थानी गुरुवारी ( १८ जानेवारी) एसीबीने धाड टाकली. तर आतापर्यंत सहा वेळा राजन साळवी एसीबी चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात हजर राहिलेत. (MLA Rajan Salvi)
तर यावेळी साळवी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ही कारवाई राजकीय सूडातून होत आहे. मी त्यांचे स्वागत केले आहे. अटकेला मी घाबरत नाही. मला हे अपेक्षित होत. पण अधिकाऱ्यांना सहकार्य करणार आहे. मी कोणालाही घाबरत नाही. माझ्या कुटुंबाला आणि जनतेला सत्य माहित आहे. तर मी सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत केले. ज्या दिवशी मला एसीबी कडून पहिली नोटीस आली आणि चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले त्याचदिवशी मला माहित होत. ही मंडळी माझ्या घरापर्यंत नक्की पोहचणार.
(हेही वाचा : Farooq Abdullah : जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला देखील राम भक्तीत मग्न)
राजन साळवी यांच्या कुटुंबाची काहीच दिवसांपूर्वी चौकशी करण्यात आली होती. त्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना अलिबाग येथील एसीबी कार्यालयात बोलाविण्यात आले होते. तर मला अटक झाली तरी चालेल, अटक जेल हे सर्व मला नवीन नाही. याचे परिणाम काहीही होऊ देत सामोर जाण्याची तयारी आहे असही ते म्हणाले.
हेही पहा –