Iran-Pakistan Conflict : पाकिस्तानचा इराणवर प्रतिहल्ला; हवाई हल्ल्यात ७ दहशतवाद्यांचा मृत्यू

पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तांनुसार, पाकिस्तानी हवाई दलाने गुरुवारी (१८ जानेवारी) इराणमध्ये बलुच फुटीरतावादी शिबिरांवर प्रत्युत्तरात्मक हवाई हल्ले केले. या हल्ल्यामध्ये ७ दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे.

323
Iran-Pakistan Conflict : पाकिस्तानचा इराणवर प्रतिहल्ला; हवाई हल्ल्यात ७ दहशतवाद्यांचा मृत्यू

इराणने मंगळवारी रात्री पाकिस्तानातील (Iran-Pakistan Conflict) बलुचिस्तानमधील सुन्नी दहशतवादी संघटनेच्या ‘जैश अल अदल’च्या (Jaish Al Adal) तळावर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ला केला. इराणची सरकारी वृत्तसंस्था IRNAने ही माहिती दिली.

(हेही वाचा – Farooq Abdullah : जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला देखील राम भक्तीत मग्न)

बलुचिस्तानातील पंजनूरमध्ये हा हवाई हल्ला (Air strike) करण्यात आला. ‘जैश अल अदल’ या दहशतवादी (Iran-Pakistan Conflict) संघटनेच्या तळांवर हल्ले करण्यात आल्याचा दावा इराणने केला. या हल्ल्याला २४ तास पूर्ण होण्याआधीच पाकिस्तानने प्रतिहल्ला केला आहे. पाकिस्तानने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात ७ दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पाकिस्तानी मीडियाने दिली आहे.

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : अयोध्येत ३६० डिग्री सुरक्षेसाठी अँटी-माइन ड्रोन तैनात)

पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तांनुसार, पाकिस्तानी हवाई (Iran-Pakistan Conflict) दलाने गुरुवारी (१८ जानेवारी) इराणमध्ये बलुच फुटीरतावादी शिबिरांवर प्रत्युत्तरात्मक हवाई हल्ले केले. या हल्ल्यामध्ये ७ दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे.

(हेही वाचा – MLA Rajan Salvi : आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरी मधील निवासस्थानी ACB ची धाड)

“पाकिस्तानी हवाई दलाने इराणमधील बलुच फुटीरतावादी शिबिरांवर (Iran-Pakistan Conflict) हवाई हल्ले केले आहेत”, असे स्थानिक पाकिस्तानी दैनिकाचे संपादक आणि न्यूयॉर्क टाइम्सचे पाकिस्तानी प्रतिनिधी सलमान मसूद यांनी बुधवारी एक्सवर पोस्ट केले. इराणने लक्ष्य केल्याचा दावा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे पाऊल उचलण्यात आले.दहशतवादी पाकिस्तानी हद्दीत आहेत, असा दावा पाकिस्तानने नागरी जीवितहानीचे कारण देत फेटाळला आहे.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.