अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी जगदगुरू रामभद्राचार्य यांच्या ७५व्या जन्मदिनानिमित्त अमृत महोत्सव सुरू आहे. बुधवारी, १७ जानेवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी नृत्य सादर केले. एकूण ५५ कलाकारांचा यात समावेश होता. हा परफॉर्मन्स रामायण आणि माँ दुर्गा या विशेष थीमवर आधारित होता.
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : मंदिराच्या गर्भगृहात आज रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना होणार)
या कार्यक्रमासाठी हेमा मालिनी (Hema Malini) अयोध्येत पोहोचल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मथुरेतील कृष्ण जन्मभूमीबाबत त्यांना प्रश्न विचारला असता
‘मथुरेतही कृष्णाचे भव्य मंदिर बनले पाहिजे’ असे त्यांनी सांगितले.
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : अयोध्येत ३६० डिग्री सुरक्षेसाठी अँटी-माइन ड्रोन तैनात)
नेमकं काय म्हणाल्या हेमा मालिनी ?
अयोध्या नंतर आता मथुरेतही (Hema Malini) श्री कृष्णाचे मंदिर झाले पाहिजे, ही आमची मागणी आहे. तुम्ही मथुरा पाहिली असेल तर तुमच्या लक्षात येईल की, मथुरा हे मंदिरांचे शहर आहे. मात्र, कृष्णाच्या जन्मस्थानी मशीद बांधण्यात आली. मात्र आता मथुरेत कृष्णाचे भव्य मंदिर बनले पाहिजे. मशिदीचा वाद मिटला पाहिजे. सध्या तिथे एक मंदिर आहे. ते मंदिर फार सुंदर आहे. मात्र, त्याठिकाणी आणखी एक भव्य मंदिर बांधले पाहिजे, असे मत भाजप खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांनी व्यक्त केले आहे.
#WATCH | Being the MP of Mathura, which is the birthplace of Lord Krishna, I will say that there should be a grand temple. A temple is already there and can be beautified like Modi Ji developed Kashi Vishwanath corridor: BJP MP Hema Malini in Indore (19.12.2021) pic.twitter.com/91N7jeiw8d
— ANI (@ANI) December 20, 2021
(हेही वाचा – Sion Traffic Changes : सायनमध्ये वाहतुकीमध्ये मोठे बदल, कुठे नो पार्किंग; कधीपासून बंद?)
श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह मशीद वादावर न्यायालयाचा मोठा निर्णय –
अशातच काही दिवसांपूर्वी मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह मशीद वादावर (Shahi Eidgah Survey) सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मशिदीची पाहणी करण्यासाठी आयुक्त (कोर्ट कमिशनर) नेमण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. मात्र, या प्रकरणाची सुनावणी सुरू ठेवावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community