- ऋजुता लुकतुके
बंगळुरूमध्ये तिसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचं कडवं आव्हान मोडून काढत भारताने मालिकाही ३-० अशी खिशात घातली. रोहित शर्माचं घणाघाती शतक त्याने रिंकू सिंगबरोबर पाचव्या गड्यासाठी केलेली नाबाद १९० धावांची भागिदारी आणि मोक्याच्या क्षणी रवी बिश्नोईने टाकलेलं सुपर ओव्हरमधील निर्धाव आणि दोन बळी टिपणारं षटक हे भारतीय विजयाचं वैशिष्ट्य ठरलं. आणि त्या जोरावरच भारतीय संघाने मालिकाही ३-० अशी निर्भेळ जिंकली. पण, या विजयात बॅटने नाही तरी क्षेत्ररक्षणात विराट कोहलीने आपलं योगदान दिलंच. (Ind vs Afg 3rd T20)
𝙒𝙄𝙉𝙉𝙀𝙍𝙎!
Congratulations #TeamIndia on winning the #INDvAFG T20I series 3⃣-0⃣ 👏👏#INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/5vxaw5SPYD
— BCCI (@BCCI) January 17, 2024
विराटला सामन्यातील ॲक्शनपासून दूर ठेवणं कठीणच आहे. फलंदाजीत फरीद अहमदच्या आखूड टप्प्याच्या चेंडूने त्याला चकवलं. आक्रमक खेळण्याच्या इराद्याने मैदानात आलेल्या विराटने पहिलाच चेंडू ऑनला तडकवण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू फक्त बॅटची कड घेऊन मिडऑफला झेल गेला. पण, फलंदाजीतील हे अपयश विराटने क्षेत्ररक्षणात किमान २० धावाव अडवून केलं असंच म्हणावं लागेल. (Ind vs Afg 3rd T20)
(हेही वाचा – PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध केली राम मंदिरावर आधारित टपाल तिकिटे)
गुरबाझ आणि नैब हे अफगाण सलामीवीर धावा जमवत असताना विराटने आधी ऑनला शिवम दुबेच्या गोलंदाजीवर किमान दोन चौकार अडवले. आणि धावचीतचा अप्रतीम प्रयत्न केला. त्यानंतर खरा विराट क्षण आला तो अफगाण डावाच्या १७व्या षटकात. वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर करीम जनतने एक जोरदार फटका लगावला. चेंडू लाँगऑनला सीमापार जाणारच होता. पण, इतक्यात विराटने तो हवेत सूर मारून अडवला. विराट झोक जाऊन सीमारेषेपलिकडे गेला. पण, त्याने चेंडू आतच रोखला. (Ind vs Afg 3rd T20)
Excellent effort near the ropes!
How’s that for a save from Virat Kohli 👌👌
Follow the Match ▶️ https://t.co/oJkETwOHlL#TeamIndia | #INDvAFG | @imVkohli | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/0AdFb1pnL4
— BCCI (@BCCI) January 17, 2024
हा फटका अडवून विराटने थेट पाच धावा अडवल्या. त्यानंतर त्याने आवेशच्या गोलंदाजीवर मजिबुल्ला झरदानचाही ३० मीटर धावत जात एक अप्रतिम झेल टिपला. थोडक्यात, अफगाणिस्तान विरुद्धच्या या टी-२० मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आपली चमक दाखवलीच. (Ind vs Afg 3rd T20)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community