अयोध्येत श्रीराम मंदिराची (Ayodhya Ram Mandir) उभारणी होणे आणि आता २२ जानेवारी रोजी त्या मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणे यामुळे देश-विदेशातील हिंदूंमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. या दिवशी देशभरात उत्सव साजरा होणार आहे. अशा वेळ या आनंदात सहभागी होता यावे म्हणून देशभरातील सर्व न्यायालयांना सुटी देण्यात यावी, अशी मागणी भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडे करण्यात आली आहे.
काय म्हटले पत्रामध्ये?
ही मागणी चक्क बार काऊंसिल ऑफ इंडियाने लेखी पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे या मागणीला विशेष महत्व आहे. हे मंदिर म्हणजे प्रदीर्घ काळ लढल्या गेलेल्या न्यायालयीन लढाईतील विजयाचे तसेच स्वप्न साकार होण्याचे हे प्रतिक आहे. राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) सोहळ्याचे धार्मिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन नम्रपणे विनंती करतो की २२ जानेवारी २०२४ या दिवशी संपूर्ण देशातील न्यायालये जसे की, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये, जिल्हा न्यायालये आणि इतर न्यायालयांमध्ये सुट्टी घोषित करावी. यावर आपण विचार करावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. ज्या याचिकांवर त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता आहे, त्यांना विशेष व्यवस्थेद्वारे समायोजित केले जाऊ शकते किंवा शक्य असल्यास, पुढील तारीख दिली जाऊ शकते, यावर विचार करावा, असेही या पत्रात म्हटले आहे.
(हेही वाचा Ayodhya Ram Mandir : १५२८ ते २०२४ अयोध्या श्रीराम मंदिराचा ५०० वर्षांचा संघर्ष)
अनोखा योगायोग…
अयोध्येतील श्रीराम मंदिराचा (Ayodhya Ram Mandir) ५०० वर्षांचा संघर्ष सर्वोच्च न्यायालयाने संपुष्टात आणला. ज्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने श्रीराम मंदिराच्या बाजूने निर्णय दिला, त्या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हेही होते, हा एक योगायोग म्हणावा लागेल. बार काऊंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी हे पत्र दिले आहे.
Join Our WhatsApp Community