- ऋजुता लुकतुके
अलीकडे दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान विरुद्ध गोलंदाजीच चमक दाखवलेला अक्षर पटेल आयसीसी टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीतही पुढे सरकत आहे. आपल्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम अशा पाचव्या स्थानावर तो पोहोचला आहे. अफगाणिस्तान विरुद्ध पहिल्या दोन टी२० सामन्यात अक्षर पटेल खेळला. आणि यात त्याने २३ धावांत २ आणि १६ धावांत २ असे एकूण चार बळी टिपले. (ICC T20i Ranking)
या कामगिरीच्या जोरावर आयसीसी क्रमवारीतही अक्षरने १२ स्थानांची झेप घेत पहिल्या दहांत स्थान मिळवलं आहे. (ICC T20i Ranking)
🇱🇰 Theekshana and Hasaranga on the charge
🌟 Yashasvi Jaiswal enters the top 10
📈 Huge leap by Axar Patel as he claims fifth spotLatest changes in the ICC Men’s Player Rankings ➡️ https://t.co/vmKs3FYFrG pic.twitter.com/4zo9M0kuLm
— ICC (@ICC) January 18, 2024
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : २२ जानेवारीला देशातील सर्व न्यायालयांना सुटी देण्याची सरन्यायाधीशांकडे मागणी)
फलंदाजीत यशस्वी जयसवालनेही सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात यशस्वीने ३४ चेंडूंत ६८ धावांची शानदार खेळी रचली होती. तर शिवम दुबेनं लागोपाठ दोन अर्धशतकांनंतर २५८व्या स्थानावरून थेट ५८व्या स्थानावर झेप घेतली आहे. (ICC T20i Ranking)
न्यूझीलंडच्या फिन ॲलननेही या आठवड्यात पाक विरुद्ध चमकदार कामगिरी केली आहे. दोन सामन्यांत ३४ आणि ७१ धावांच्या जोरावर फलंदाजांच्या क्रमवारीत सोळाव्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताच्या शुभमन गिल, अर्शदीप सिंग आणि तिलक वर्मा यांनीही क्रमवारीत आगेकूच केली आहे. (ICC T20i Ranking)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community