- ऋजुता लुकतुके
टी-२० मधील घणाघाती फलंदाज सुर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) बुधवारी आपल्या चाहत्यांना आपल्या दुखापतीविषयीचा एक महत्त्वाचा अपडेट दिला. जर्मनीत त्याच्यावर स्पोर्ट्स हार्नियासाठी शस्त्रक्रिया पार पडली आहे. आणि यातून पूर्ण बरा होण्यासाठी त्याला एक महिना लागणार आहे. पण, आपली तब्येत आता ठणठणीत आहे, असं सुर्यकुमारने (Suryakumar Yadav) म्हटलं आहे. (Suryakumar Yadav)
‘शस्त्रक्रिया झाली. माझ्या तब्येतीसाठी प्रार्थना करणाऱ्या आणि माझी चौकशी करणाऱ्या सर्वांचे आभार. सगळ्यांना मी एवढंच सांगू इच्चितो की, मी लवकरच मैदानावर परतणार आहे,’ असं सुर्यकुमारने (Suryakumar Yadav) आपल्या सोशल मीडियावरील संदेशात लिहिलं आहे. (Suryakumar Yadav)
(हेही वाचा – WFI Row : तात्पुरत्या समितीने भरवलेली राष्ट्रीय स्पर्धाच अधिकृत)
Surgery done✅
I want to thank everyone for their concerns and well wishes for my health, and I am happy to tell you all that I will be back very soon 💪 pic.twitter.com/fB1faLIiYT
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) January 17, 2024
सुर्यकुमार (Suryakumar Yadav) आता आयपीएलमध्ये (IPL) क्रिकेट मैदानावर पुनरागमन करेल. त्यानंतर टी-२० विश्वचषकानंतर तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल, असा अंदाज आहे. मागचं वर्षभर सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) टी-२० प्रकारात भन्नाट फॉर्ममध्ये आहे. विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुर्यकुमारने (Suryakumar Yadav) कर्णधारपदही भूषवलं. आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३-२ असा मालिकेत विजय मिळवला. तर दक्षिण आफ्रिकेत १-१ अशी मालिका बरोबरीत सोडवली. (Suryakumar Yadav)
जागतिक क्रमवारीत टी-२० फलंदाजांच्या यादीत सुर्यकुमार (Suryakumar Yadav) पहिल्या स्थानावर आहे. (Suryakumar Yadav)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community