Rammandir Ayodhya : 22 जानेवारीला सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार का ?; केंद्रीय राज्यमंत्री काय म्हणाले…

Rammandir Ayodhya : अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण भारतात साजरी केली जाईल. शासकीय कर्मचार्‍यांना या उत्सवात सहभागी होता यावे यासाठी 22 जानेवारी रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत.

315
Rammandir Ayodhya : 22 जानेवारीला सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार का ?; केंद्रीय राज्यमंत्री काय म्हणाले...
Rammandir Ayodhya : 22 जानेवारीला सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार का ?; केंद्रीय राज्यमंत्री काय म्हणाले...

राममंदिराच्या उद्घाटनाची तयारी सुरु आहे. त्या सोहळ्याचा सर्वांना आनंद घेता यावा, यासाठी त्या दिवशी सुट्टी द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (Rammandir Ayodhya) याविषयी केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी मोठी घोषणा केली आहे. मोदी सरकारने गुरुवार, 18 जानेवारी रोजी ही मोठी घोषणा केली. 22 जानेवारीला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या दिनी केंद्रीय सरकारी कार्यालये अर्धा दिवस बंद रहातील. जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (half day on 22 january)

(हेही वाचा – Udaynidhi Stalin : उदयनिधी स्टॅलिन आता राम मंदिरावर बरळले; म्हणाले, ”मशीद पाडून मंदिर बांधणे अमान्य…” )

दुपारी 2.30 वाजेपर्यंत कार्यालये बंद

अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण भारतात साजरी केली जाईल. शासकीय कर्मचार्‍यांना या उत्सवात सहभागी होता यावे यासाठी 22 जानेवारी रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत भारतातील केंद्र सरकारची सर्व कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापने अर्धा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे या आदेशात म्हटले आहे.

राममंदिरावरील टपाल तिकीट जारी

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या (Rammandir Pran Pratishtha) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अयोध्येतील राममंदिरावरील टपाल तिकीट (Rammandir Postal stamp) आणि जगभरातील प्रभु रामावर जारी केलेल्या टपाल तिकिटांचे पुस्तक प्रसिद्ध केले. या वेळी मोदी म्हणाले की, राम, सीता आणि रामायण यांची महानता काळ, समाज, जात, धर्म आणि प्रदेशाच्या सीमांच्या पलीकडे आहे. ते सर्वांना जोडतात.

(हेही वाचा – BMC Khichdi Scam : खिचडी घोटाळ्याचे पैसे राऊतांच्या मुलीच्या खात्यात; किरीट सोमय्या यांचा आरोप)

या सोहळ्यासाठी आतापर्यंत अनेक राज्यांनी सुट्टी घोषित केली आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गोवा, हरियाणा आणि छत्तीसगडमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.