राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील सुरु झालेली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा नागालँडमधून आता आसाममध्ये पोहोचली आहे. शिवसागर जिल्ह्यातून सुरू होऊन ही यात्रा आसामच्या १७ जिल्ह्यांमधून जाणार आहे. यात गुवाहाटी शहराचाही समावेश करण्यात आला आहे, मात्र आता राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (CM Himanta Biswa Sarma) ही यात्रा शहरातून काढण्यास विरोध केला आहे.
(हेही वाचा Udaynidhi Stalin : उदयनिधी स्टॅलिन आता राम मंदिरावर बरळले; म्हणाले, ”मशीद पाडून मंदिर बांधणे अमान्य…” )
काय म्हणाले मुख्यमंत्री सरमा?
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बस्वा सरमा (CM Himanta Biswa Sarma) म्हणाले, ही यात्रा शहरांमधून काढू नका. त्यांच्याकडून जो कोणता पर्यायी मार्ग मागितला जाईल, त्याची परवानगी दिली जाईल. मात्र शहरातूनच ही यात्रा काढण्याचा अट्टहास केला, तर आम्ही पोलीस व्यवस्था लावणार नाही. मी सरळ गुन्हा दाखल करेन आणि निवडणुकीनंतर अटक करेन. सध्या काही करणार नाही. ही न्याय यात्रा नाही, तर मियां यात्रा आहे. जेथे जेथे मुस्लीम आहेत, तेथे तेथे त्यांची ही यात्रा सुरू आहे.
Join Our WhatsApp Community