Choor Singh : सिंगापूरच्या महिलेला फाशीची शिक्षा ठोठावणारे पहिले न्यायाधीश चूर सिंह

Choor Singh : १९६० मध्ये त्यांची जिल्हा न्यायाधीश आणि १९६३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते सिंगापूरचे पहिले असे न्यायाधीश ठरले ज्यांनी एका महिलेला फाशीची शिक्षा ठोठावली.

223
Choor Singh : सिंगापूरच्या महिलेला फाशीची शिक्षा ठोठावणारे पहिले न्यायाधीश चूर सिंह
Choor Singh : सिंगापूरच्या महिलेला फाशीची शिक्षा ठोठावणारे पहिले न्यायाधीश चूर सिंह

चूर सिंह सिद्धू यांना चूर सिंह म्हणून ओळखले जाते. सिंगापूरच्या (Singapore) सर्वोच्च न्यायालयाचे ते न्यायाधीश होते. चूर सिंह (Choor Singh) यांचा जन्म १९ जानेवारी १९११ रोजी पंजाबमध्ये झाला. ते चार वर्षांचे असताना त्यांची आई सिंगापूरला आली. त्यांचे वडील आधीपासून सिंगापूरमधील गोडाऊनमध्ये नाईट वॉचमन म्हणून कामाला होता. त्यामुळे त्यांचे बालपण सिंगापूरमध्ये गेलं.

(हेही वाचा – Maratha-Kunbi Certificates : मराठा-कुणबी प्रमाणपत्रासाठी शिबिरे घ्यावीत; डॉ. राजगोपाल देवरा यांचे निर्देश)

न्यायदंडाधिकारी पदावर जाणारे पहिले भारतीय

चूर सिंह यांनी प्रचंड कष्ट घेतले आणि ते कायदेतज्ञ झाले. त्यांनी १९२९ मध्ये रॅफल्स इन्स्टिट्यूशनमध्ये (Raffles Institution) उच्च वर्गात आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आणि पुढे लॉ कायद्याच्या फर्ममध्ये लिपिक म्हणून काम केले. पुढे त्यांनी अतिशय चिकाटीने कायद्याचे शिक्षण घेतले. १९४८ मध्ये त्यांना कोरोनर म्हणून नियुक्त केले गेले आणि पुढच्याच वर्षी त्यांनी मोठी मजल मारली. त्यांची न्यायदंडाधिकारी पदावर बढती झाली. विशेष म्हणजे या पदावर जाणारे ते पहिले भारतीय होते.

शीख समुदायाच्या न्याय्य हक्कासाठी लढा

१९६० मध्ये त्यांची जिल्हा न्यायाधीश आणि १९६३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते सिंगापूरचे पहिले असे न्यायाधीश ठरले ज्यांनी एका महिलेला फाशीची शिक्षा ठोठावली. निवृत्तीनंतर त्यांनी शीख पंथावर पुस्तक लिहिले आहे. १९३१ साली त्यांनी सिंगापूर खालसा असोसिएशनची (Singapore Khalsa Association) स्थापना केली होती. शीख समुदायाच्या बाबतीत ते खूप हळवे होते आणि त्यांच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी आवाज देखील उचलला. ३१ मार्च २००९ रोजी वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. (Choor Singh)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.