Tilak Park Girgaon : स्वराज्यभूमीवरील टिळक उद्यानात ‘लाईट एण्ड साऊंड शो’

299
Tilak Park Girgaon : स्वराज्यभूमीवरील टिळक उद्यानात ‘लाईट एण्ड साऊंड शो’
Tilak Park Girgaon : स्वराज्यभूमीवरील टिळक उद्यानात ‘लाईट एण्ड साऊंड शो’
विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील स्वराज्यभूमी अर्थात गिरगाव चौपाटी येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उद्यानात (Tilak Park Girgaon) शिवराज्याभिषेक, रामायणातील प्रसंग, लोकमान्य टिळक यांचा जीवनपट आणि मुंबई शहराची झलक हे सर्व काही आता लाईट एण्ड साऊंड शो च्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. महानगरपालिकेच्या डी विभागाच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी १८ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले. या प्रसंगी याच ठिकाणी तयार करण्यात आलेल्या ग्लो पार्कचेही लोकार्पण यानिमित्ताने झाले.

राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री आणि स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, अतिरिक्त आयुक्त शहर डॉ. अश्विनी जोशी, उपआयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे, डी विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे, लोकमान्य टिळक ट्रस्टचे पदाधिकारी यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.

DSC 0571 1 scaled

(हेही वाचा – Gopinath Savkar Award : “उचल” एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार)

मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या कौतुक करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या काळात विविध थोर पुरूष आणि विविध विषयांवर आधारीत लाईट एण्ड शो प्रोजेक्शन मॕपिंगच्या माध्यमातून पहायला मिळतील, असाही विश्वास व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, स्वराज्यभूमी येथे सुशोभीकरणाच्या कामासाठी तसेच याठिकाणी नागरिकांना देण्यात येणार्‍या सुविधेसाठी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सतत पाठपुरावा केला आहे. विविध सेवा सुविधा देण्याचा विषय त्यांनी उचलून धरला. तसेच मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही या कामात योगदान दिले आहे, असेही फडणवीस म्हणाले.

मुंबई महानगरातील नागरिक आणि मुंबईत येणारे पर्यटक स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे आवर्जून येतात. स्वराज्यभूमीवरच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे स्मारक व पूर्णाकृती पुतळादेखील आहे. हा परिसर उद्यानाच्या स्वरूपात पूर्वीपासून विकसित आहे. या ठिकाणाचे महत्व लक्षात घेता याठिकाणी प्रोजेक्शन मॅपिंगसह लाईट एण्ड साऊंड शो सुरू करण्याचा तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उद्यानाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला.

(हेही वाचा – Choor Singh : सिंगापूरच्या महिलेला फाशीची शिक्षा ठोठावणारे पहिले न्यायाधीश चूर सिंह)

आठ मिनिटांचा शो
त्यानुसार महानगरपालिकेच्या डी विभागाच्या माध्यमातून टिळक उद्यानात सदर कामे करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने रायगड किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. रायगडाच्या या प्रतिकृतीवर वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारीत प्रोजेक्शन मॅपिंग करण्यात येणार आहे. त्यामध्ये शिवराज्याभिषेक, रामायणातील प्रसंग, लोकमान्य टिळक यांचा जीवनपट, मुंबई शहराची ठळक वैशिष्ट्ये यांचा समावेश आहे. प्रत्येक प्रोजेक्शन मॅपिंगच्या चलचित्राचा कालावधी हा ८ मिनिटांचा असणार आहे, सोबत त्याला ध्वनि संयोजक असल्याने मुंबईकरांना व पर्यटकांना अनोखा अनुभव येईल, अशी माहिती डी विभागाचे सहायक आयुक्त श्री. शरद उघडे यांनी दिली.
सायंकाळी ७ ते १० च्या वेळेत
शनिवार आणि रविवार, सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस तसेच स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हे प्रोजेक्शन मॅपिंगचे चलचित्र दाखवण्याचे प्रस्तावित आहे. सायंकाळी ७ ते रात्री १० वेळेत या कालावधीत प्रोजेक्शन मॅपिंग दाखवण्यात येईल.
लोकमान्य टिळक उद्यानात ग्लो पार्क
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उद्यानाचे सुशोभिकरणही डी विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उद्यानातील पदपथ, हिरवळ, शोभिवंत फुलांची झाडे, विद्युतीकरण, हेरिटेज रेलिंग, आकर्षक आसनव्यवस्था इत्यादी वैशिष्ट्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या उद्यानामध्ये ग्लो पार्कदेखील तयार करण्यात आले आहे. खासकरून लहान मुलांकरिता तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या कामांचे ग्लो पार्कचे लोकार्पणदेखील यानिमित्ताने झाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.