गुजरातच्या वडोदरा येथील हर्णी तलावात विद्यार्थ्यांनी भरलेली बोट (Baroda Boat Capsized) उलटली. या हृदयद्रावक घटनेत २ शिक्षकांसह १२ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार १८ जानेवारी रोजी घडली. केवळ १५ जणांची मर्यादा असलेल्या बोटीवर न्यू सनराइज स्कूलचे २५ ते २७ विद्यार्थी बसवले होते. यावेळी त्यांना लाईफ जॅकेट देखील घातले नव्हते.
(हेही वाचा – Ram Mandir Ayodhya : आंदोलनाचे १० शिलेदार…)
कसा झाला अपघात ?
या घनटेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी (Baroda Boat Capsized) पोहोचले आणि इतर विद्यार्थ्यांना वाचवण्यात आले. या घटनेतील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. बोटीत जास्त विद्यार्थ्यी बसल्यामुळे ही घटना घडली. तसेच, विद्यार्थ्यांना लाईफ जॅकेटदेखील घातले नव्हते, ज्यामुळे २ शिक्षक आणि १०-१२ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे बडोद्याचे जिल्हाधिकारी एबी गोरे यांनी सांगितले आहे. दरम्यान, दोषींवर कारवाई केली जाईल, असे बडोदरा महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष डॉ.शिलत मिस्त्री यांनी सांगितले. (Baroda Boat Capsized)
(हेही वाचा – Ayodhya Ram mandir : राममंदिर – पतित पावन मंदिराचे व्यापक स्वरूप, सामाजिक समरसतेचे प्रतीक)
मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
या घटनेवर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. प्राण गमावलेल्या निष्पाप मुलांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी मी प्रार्थना करतो. या दु:खाच्या काळात त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून संवेदना. देव त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, असे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल (Chief Minister Bhupendra Patel) यांनी आपल्या शोक संदेशात म्हंटले आहे. (Baroda Boat Capsized)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community