अयोध्येत श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी (२२ जानेवारी) रोजी पार पडणार आहे. मंदिरात प्राणप्रतिष्ठा पूजा पाच तास चालणार आहे. या प्राणप्रतिष्ठेसाठी ८४ सेकंदाचा मुहूर्त असणार आहे. सकाळी १२.२९ ते १२.३० दरम्यान प्राणप्रतिष्ठा होणार आहे. रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना झाल्यावर महापूजा, आरती होणार आहे. १६ जानेवारीपासूनच येथे विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. मुख्य सोहळा हा २२ जानेवारी रोजी असणार आहे. या कर्यक्रमाला ५० देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.(Ram Mandir Programme Schedule)
असा असणार कार्यक्रम
१०.३० पर्यन्त प्रमुख अतिथींना आपल्या जागेवर बसावे लागणार आहे
१२.२० ते १ वाजेपर्यन्त मुख्य प्राणप्रतिष्ठा पूजा
१२.२९ ते १२.३० प्राणप्रतिष्ठा
प्राणप्रतिष्ठेनंतर महापूजा आणि महाआरती
१ ते २.१५ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत व महंत नृत्यगोपाल दास यांचे संबोधन
२.३० पासून ८००० आमंत्रित पाहुण्यांना दर्शन घेता येणार
५० देशामधून आलेले प्रतिनिधि रामलल्लाचे दर्शन घेणार
(हेही वाचा : Ram Lalla Idol First Photo : राम मंदिराच्या गर्भगृहातील मूर्तीचा पहिला फोटो वायरल)
अभिषेक प्रसंगी यांची असेल उपस्थिती
२२ जानीवरी रोजी अभिषेक प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी,राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संघ प्रमुख मोहन भागवत आणि ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास गर्भगृहात उपस्थित राहणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community