पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शुक्रवारी (१९जानेवारी) सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी अनेक विकासकामांचे उदघाटन केले. ९० हजार घराचे लोकार्पण करण्यात आले. ३० हजार डेमो फ्लॅटची पाहणी केली. तसेच १० लाभार्थ्यांना कर्ज वाटप करण्यात आले. अमृत योजनेतून १७०० कोटींच्या प्रकल्पाची पायाभरणी मोदींनी केली.
सोलापूर दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर बोलताना माकपचे माजी आमदार नरसय्या आडम (Ml Narasayya Adam) यांचा व्यासपीठावर गोंधळ झाला. मात्र आडाम यांच्या भाषणाच्या सुरुवातीनेच अनेकांच्या भुवया उंचावल्या. मान्यवरांच स्वागत करताना आडम चुकून उपमुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे असे म्हणाले.मात्र आपली चूक लक्षात येतच आडाम यांनी आपली चूक सुधारली. व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांची मंचावरुनच माफी देखील मागितली.
(हेही वाचा : Ayodhya Ram Mandir : उत्तर प्रदेशमधील कैद्यांनी बनविले ५१ हजार दिवे, ४० हजार ध्वज)
काय म्हणाले आडम आपल्या भाषणाच्या सुरवातीला
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, भारत सरकार, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस जी, राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे, अं उद्धव ठाकरे माफ करा… देवेंद्र फडणवीस और उद्धव ठाकरे हमेशा आनेसे मेरे मूह में बैठा, मै माफी चाहता हू देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मान्यवर सभी, सभी अधिकारी वर्ग, मेरी माँ बहनो, बुजुर्गो… अशी सुरुवात आडम मास्तर यांनी केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community