Soumitra Chatterjee : फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार पहिले भारतीय कलाकार सौमित्र चटर्जी

Soumitra Chatterjee : सौमित्र यांना अनेक सन्मान आणि पुरस्कार मिळाले होते. सौमित्र हे पहिले भारतीय कलाकार होते ज्यांना १९९९ रोजी artists 'Commandeur' of, Ordre des Arts et des Lettres हा फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

179
Soumitra Chatterjee : फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार पहिले भारतीय कलाकार सौमित्र चटर्जी
Soumitra Chatterjee : फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार पहिले भारतीय कलाकार सौमित्र चटर्जी

सौमित्र चॅटर्जी हे भारतीय चित्रपट अभिनेता, नाटक-दिग्दर्शक, नाटककार, लेखक आणि कवी होते. (Soumitra Chatterjee) भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वांत महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे. सौमित्र चॅटर्जी यांचा जन्म १९३५ मध्ये कलकत्ता येथील मिर्जापूरमध्ये झाला. त्यांचे आजोबा एका नाट्यसंस्थेचे अध्यक्ष होते. त्यांचे वडील व्यवसायाने वकील असले, तरी प्रायोगिक रंगभूमीवर सक्रिय होते. त्यामुळे त्यांच्यावर घरातूनच कलेचे संस्कार झाले.

(हेही वाचा – Narasayya Adam : नरसय्या आडम यांनी मागितली देवेंद्र फडणवीस यांची जाहीर माफी; सोलपुरात काय झाला गोंधळ)

२१० पेक्षा अधिक चित्रपटात काम

१९५९ रोजी आलेल्या अपूर्व संसार (Apoorva Samsaara) या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली. अभिजन, चारुलता, कापुरुष, अरण्येर दिन रात्री, आशानी संकेत, सोनार केल्ला, शाखा प्रशाखा, गणशत्रू अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी अंदाजे २१० पेक्षा अधिक चित्रपटात काम केले आहे. त्याचबरोबर दिग्दर्शनाच्या क्षेत्रातली त्यांना चांगली प्रसिद्धी लाभली. ‘स्त्री की पात्र’ या चित्रपटासाठी त्यांच्या दिग्दर्शनाची स्तुती करण्यात आली.

(हेही वाचा – Governor Ramesh Bais : नवी पिढी हिंदी, मराठी लिहू – वाचू शकत नाही ही चिंतेची बाब)

दोन राष्ट्रीय पुरस्कारांवर कोरले नाव

त्यांनी दिग्दर्शक सत्यजित रे (Satyajit Ray) यांच्याबरोबर देखील चौदा चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच सौमित्र यांना अनेक सन्मान आणि पुरस्कार मिळाले होते. सौमित्र हे पहिले भारतीय कलाकार होते ज्यांना १९९९ रोजी artists ‘Commandeur’ of, Ordre des Arts et des Lettres हा फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. २००४ साली पद्मभूषण देऊन भारतानेही त्यांचा गौरव केला. त्यांनी दोन राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले. त्याचबरोबर २०१२ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) प्राप्त झाला. (Soumitra Chatterjee)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.