-
ऋजुता लुकतुके
भारताच्या सुमित नागलने (Sumit Nagal) पहिल्या फेरीत क्रमवारीत ३० च्या आत असलेल्या ॲलेक्झांडर बिबलिकला हरवत सनसनाटी विजय नोंदवला होता. मागच्या ३५ वर्षांत भारतीय खेळाडूने सिडेड खेळाडूला हरवून दुसरी फेरी गाठल्याचीही ही पहिलीच वेळ होती. पण, अखेर सुमितचा हा प्रवास दुसऱ्या फेरीत चीनच्या युनचेंग शँगने थांबवला. शँगने सुमितचा चार सेटमध्ये २-६, ६-३, ७-५ आणि ६-४ असा पराभव केला. (Australian Open 2024)
सुमितने सामन्याची सुरुवात आधीसारखीच आक्रमक केली होती. आणि पहिला सेटही त्याने ६-२ असा आरामात जिंकला. पण, स्पर्धेत वाईल्ड कार्ड प्रवेश मिळालेला १८ वर्षी शँग सुमितपेक्षा जास्त तंदुरुस्त आणि सरस ठरला. (Australian Open 2024)
What a rollercoaster the last few days have been at the Australian Open. Disappointed to not get over the line today, but also proud of the run I had 🙌🏽
Thanks a lot to my sponsors Indian Oil, Aryan Pumps, Yonex, ASICS, Gatorade & Maha Tennis Foundation for the support 🙏🏽
(1/n) pic.twitter.com/L9FV2BZuXG
— Sumit Nagal (@nagalsumit) January 18, 2024
(हेही वाचा – CM Eknath Shinde : जगभरात मोदींच्या नावाला मान; देशात पुन्हा मोदीच येणार)
२ तास ५० मिनिटं हा सामना चालला. आणि यात चौथ्या सेटमध्ये ४-६ असे गुण दिसत असले तरी सुमित थकलेला स्पष्ट दिसत होता. उलट शँगची सर्व्हिस चांगलीच सुधारली होती. आणि त्याचे फटकेही ताकदवान भासत होते. नागलचा बेसलाईन खेळ मात्र या सामन्यात चांगला झाला. आणि सुरुवातीच्या खेळात त्याने त्यावरच शँगला चकवलं. पण, हळू हळू शँगने आक्रमण सुरू केलं. आणि ते परतवताना सुमितची दमछाक झाली. (Australian Open 2024)
पण, सुमितसाठी तरीही या ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या आठवणी चांगल्याच असतील. ३५ वर्षांत पहिल्यांदाच या स्पर्धेत एखाद्या भारतीयाने एकेरीत क्रमवारीत ३० च्या आत असलेल्या खेळाडूचा पराभव केला. शिवाय, पहिल्या फेरीतील यशामुळे सुमितला जवळ जवळ ९८ लाख रुपयांचा लाभ झाला आहे. आणि त्यातून तो वर्षभरातील कित्येक स्पर्धा खेळण्याचा निधी उभारू शकतो. (Australian Open 2024)
दुसरीकडे, भारताचा सीनिअर दुहेरी खेळाडू रोहन बोपान्नाने आपला ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एबडनबरोबर आगेकूच सुरू ठेवली आहे. (Australian Open 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community