AFC Asian Cup 2024 : भारताचा उझबेकिस्तानकडून ०-३ असा पराभव

स्पर्धेतील सलग दुसऱ्या पराभवामुळे भारतीय संघ आता स्पर्धेतून बाद होण्याच्या मार्गावर आहे. 

229
AFC Asian Cup 2024 : भारताचा उझबेकिस्तानकडून ०-३ असा पराभव
AFC Asian Cup 2024 : भारताचा उझबेकिस्तानकडून ०-३ असा पराभव
  • ऋजुता लुकतुके

आशिया चषकाच्या बी गटात भारतीय संघाचा (Indian team) उझबेकिस्तानकडून ०-३ असा पराभव झाला. यात पराभव तर झोंबणारा होताच. पण, ज्या पद्धतीने पराभव झाला ते जास्त झोंबणारं होतं. उझबेकिस्तानसमोर भारतीय संघ एखाद्या शाळकरी मुलांच्या संघासारखा वाटत होता. उझबेकिस्तानचा संघ या विजयासाह आता बी गटात दुसऱ्या स्थानावर आहे. आणि बाद फेरीसाठी पात्र ठरण्याच्या उंबरठ्यावर आहे. उलट भारतीय आव्हान संपल्यात जमा आहे. (AFC Asian Cup 2024)

या सामन्यात बहुतांश वेळा चेंडूचा ताबा उझबेकी खेळाडूंकडेच होता. आणि भारतीय खेळाडू चेंडूचा पाठलाग करतानाच दिसले. (AFC Asian Cup 2024)

पहिल्या २० मिनिटांतच उझबेकी खेळाडूंनी भारतीय गोलजाळ्यावर चार आक्रमणं केली. चारही गोलच्या जवळ जाणारी होती. पण, यातील दोन प्रयत्नांत गोल झाले. त्यामुळे २० मिनिटांतच गोल फरक होता २-०. मध्यंतराला थोडाच वेळ असताना आकाश मिश्राच्या प्रयत्नांमुळे भारताने गोल करण्याचे दोन निकराचे प्रयत्न केले. सुनील छेत्रीचा एक हेडर तर नेटवरून गेला. या दोन संधी हुकल्यानंतर भारतीय संघ फारशी चमक दाखवू शकला नाही. (AFC Asian Cup 2024)

(हेही वाचा – PM Narendra Modi : … आणि पंतप्रधान मोदी झाले भावूक)

नाही म्हणायला राहुल भेकेनं ७२व्या मिनिटाला हेडरवर गोल करण्याचा चांगला प्रयत्न केला होता. पण, गोलीने तो अचूक अडवला. (AFC Asian Cup 2024)

बी गटात आता ऑस्ट्रेलियाचा संघ सलग दोन विजयांसह अव्वल स्थानावर आहे. तर उझबेकिस्तानचा संघ भारताविरुद्धच्या पहिल्या विजयानंतर दुसऱ्या स्थानावर आहे. सीरियाबरोबरचा त्यांचा सामना बरोबरीत सुटला होता. सीरियाचा संघही तिसऱ्या स्थानावर आहे. याउलट सलग दोन पराभवांमुळे भारतीय संघ (Indian team) तळाला आहे. (AFC Asian Cup 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.