-
ऋजुता लुकतुके
माजी आंतरराष्ट्रीय पदक विजेता खेळाडू आणि मनू भाकरचा वैयक्तिक प्रशिक्षक जसपाल राणाने (Jaspal Rana) नॅशनल रायफल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांवर अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. भारतीय संघाचे हाय परफॉर्मन्स कोच पिअर ब्युचँप यांनी जसपालला दिल्लीतील करणीसिंग शुटिंग रेज सोडून जाण्यास सांगितल्याचा आरोप जसपाल राणाने (Jaspal Rana) केला आहे. तर रायफल असोसिएशनही इथं ब्युचँप यांचीच बाजू घेत असल्याचं दिसतंय.
मनू भाकर ही भारताची राष्ट्रकूल आणि युवा राष्ट्रकूल विजेती नेमबाज आहे. ती करणीसिंग स्टेडिअममध्ये सराव करते. आणि जसपाल राणा हे तिचे वैयक्तिक प्रशिक्षक आहे. पण, गुरुवारी मनूबरोबर सरावासाठी गेला असताना आपल्याला प्रवेश नाकारण्यात आला असं जसपालने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं आहे.
‘नेमबाज सराव करत होते, तिथून खूप लांब मी उभा होतो. कुणाशी बोलतही नव्हतो. पण, पिअर ब्युचँप यांनी मला येऊन तिथून निघून जाण्यास सांगितलं. मी माजी राष्ट्रीय प्रशिक्षक होतो. अर्जुन पुरस्कार विजेता खेळाडू आहे, याची आठवण मी त्यांना करून दिली. पण, त्यांनी तरीही मला जायला सांगितलं,’ असं जसपाल राणा (Jaspal Rana) म्हणाले.
(हेही वाचा – Actress Nayanthara ने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल मागितली माफी)
यावर नॅशनल रायफल असोसिएशननेही आपली प्रतिक्रिया देताना, ‘खेळाडू आणि अधिकाऱ्यांनी त्यांच्यासाठी असलेल्या नियमांचं पालन करावं. तेच खेळाच्या आणि खेळाडूंच्या हिताचं आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
जसपाल राणा (Jaspal Rana) १९९० च्या दशकात भारतातील आघाडीच्या पिस्तुल नेमबाजांपैकी एक होता. त्याने आशियाई क्रीडास्पर्धतेही पदकं मिळवली आहेत. तर मनू भाकर ही आघाडीची पिस्तुल नेमबाज असून तिने राष्ट्रकूल सुवर्णासह, नेमबाजीतील विश्वचषक आणि विश्वविजेतेपद स्पर्धेतही पदकं जिंकली आहेत.
टोकयो ऑलिम्पिकपूर्वी पर्यंत जसपाल राणा (Jaspal Rana) तिचे वैयक्तिक प्रशिक्षक होते. पण, दोघांमधील वैचारिक मतभेदांमुळे ऑलिम्पिकच्या काही महिने आधी दोघं वेगळे झाले. पण, आधीच्या मनूच्या कामगिरीचं श्रेय जसपाल राणांच्या (Jaspal Rana) मार्गदर्शनाला दिलं जात होतं.
टोकयो ऑलिम्पिकमधील अपयशानंतर मनू भाकरने पुन्हा एकदा जसपाल राणा (Jaspal Rana) यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community