HDFC to Expand : एचडीएफसीला हवी सिंगापूरमध्ये शाखा उघडण्यासाठी परवानगी

भारतातील सगळ्यात मोठी खाजगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेला आता सिंगापूरमध्ये म्हणजे देशाबाहेर शाखा उघडण्याचे वेध लागले आहेत. 

199
HDFC to Expand : एचडीएफसीला हवी सिंगापूरमध्ये शाखा उघडण्यासाठी परवानगी
HDFC to Expand : एचडीएफसीला हवी सिंगापूरमध्ये शाखा उघडण्यासाठी परवानगी
  • ऋजुता लुकतुके

एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) गेल्यावर्षीच्या गाजलेल्या विलिनीकरणानंतर ही बँक देशातील सगळ्यात मोठी खाजगी बँक बनली आहे. आणि आता बँकेला परदेशात विस्तार करण्याचे वेध लागले आहेत. सिंगापूरमध्ये एचडीएफसी बँकेची (HDFC Bank) आंतरराष्ट्रीय शाखा उघडण्यासाठी बँकेनं तिथे परवान्याचा अर्ज केला आहे. (HDFC to Expand)

भारतात एचडीएफसी बँकेला (HDFC Bank) वैयक्तिक आणि किरकोळ कर्जांवर लक्ष केंद्रीत करायचं आहे. आणि तिथे विस्तार करून देशातील जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचायचं आहे. तर भारताबाहेर तिथल्या भारतीय वंशाच्या समाजाला बँकिंग सेवा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. (HDFC to Expand)

सिंगापूर देशाची लोकसंख्या ६५ लाख इतकी आहे. आणि यातील जवळ जवळ साडेसहा लाख लोक हे भारतीय वंशाचे आहेत. या लोकसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आता एचडीएफसी बँक (HDFC Bank) करणार आहे. सिंगापूरमध्ये बँकिंग परवान्याचे वेगवेगळे निकष आहेत. सर्व प्रकारच्या बँकिंग सेवांचा परवाना असलेल्या बँका, क्वालीफाइंग फुल बँक आणि होलसेल बँक असे तीन परवाने सिंगापूर सरकार देऊ करतं. (HDFC to Expand)

(हेही वाचा – Australian Open 2024 : सुमित नागलचा दुसऱ्या फेरीत पराभव, रोहन बोपान्नाची दुहेरीत आगेकूच)

या बँकांना क्वालीफाइंग फुल बँकेचा मिळाला दर्जा 

यात शेवटच्या दोन प्रकारात बँकिंग सेवा देण्यासाठी तिथल्या सरकारचे अशा बँकांवर बरेच निर्बंध आहेत. तर पूर्ण परवाना असलेल्या बँका निर्धोकपणे काम करू शकतात. आतापर्यंत स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय बँक (ICICI) यांनाच सिंगापूरमध्ये क्वालीफाइंग फुल बँकेचा दर्जा मिळालेला आहे. याशिवाय इतर देशातील बँक ऑफ चायना, बीएनपी पारिबास अशा इतर आठ बँकांना क्वालीफाइंग बँकेचा दर्जा आहे. (HDFC to Expand)

आता एचडीएफसी बँकही (HDFC Bank) तिथल्या नागरिकांना मुदतठेवी, बचत खाती अशा मूलभूत सुविधा देण्यासाठी परवाना मिळवण्याच्या प्रयत्नांत आहे. एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) आंतरराष्ट्रीय शाखा हाँग काँग, लंडन आणि बहारिनमध्ये आहेत. (HDFC to Expand)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.