Support for Poor Prisoner या योजनेअंतर्गत ५७४ कैद्यांना होणार लाभ

महाराष्ट्रातील तुरुंगामध्ये कैद्यांची वाढत्या संख्येमुळे जवळपास अनेक तुरुंग भरले आहे. अनेक तुरुंगात तर नवीन कैद्यांना ठेवण्यासाठी देखील जागा नसल्यामुळे कैद्यांना दाटीवाटीने बॅरेक मध्ये राहावे लागत आहे. सर्वात अधिक कैदी मुंबईतील आर्थर रोड, ठाणे मध्यवर्ती, कल्याण आधारवाडी, आणि तळोजा या तुरुंगात आहे.

188
Support for Poor Prisoner या योजनेअंतर्गत ५७४ कैद्यांना होणार लाभ
Support for Poor Prisoner या योजनेअंतर्गत ५७४ कैद्यांना होणार लाभ

गुन्ह्यात जामीन होऊन देखील जामीन भरण्यास पैसे नसल्यामुळे तुरुंगात खितपत पडलेल्या कैद्यांना केंद्र सरकारच्या ‘सपोर्ट फॉर पुअर प्रिझनर योजने’कडून दिलासा मिळत आहे. या योजनेचा महाराष्ट्रातील कारागृहातील ५७४ कैद्यांना त्याचा लाभ होणार आहे, त्याच बरोबर राज्यातील तुरुंगातील कैद्यांची संख्या देखील कमी होण्यास मदत होणार आहे. (Support for Poor Prisoner)

महाराष्ट्रातील तुरुंगामध्ये कैद्यांची वाढत्या संख्येमुळे जवळपास अनेक तुरुंग भरले आहे. अनेक तुरुंगात तर नवीन कैद्यांना ठेवण्यासाठी देखील जागा नसल्यामुळे कैद्यांना दाटीवाटीने बॅरेक मध्ये राहावे लागत आहे. सर्वात अधिक कैदी मुंबईतील आर्थर रोड, ठाणे मध्यवर्ती, कल्याण आधारवाडी, आणि तळोजा या तुरुंगात आहे. हे तुरुंग हाऊसफुल्ल होऊन ही नव्या कैद्यांना पाठवले जात आहे. मुंबईतील आर्थर रोड, कल्याणचे आधारवाडी, ठाण्यातील मध्यवर्ती आणि तळोजा येथील तुरुंगात कच्चे कैद्यांना (न्यायबंदी) ठेवण्यात आले आहे. त्यातील अनेकांना जामीन झालेला आहे, मात्र जामीन भरण्याची ऐपत नसल्यामुळे अनेक हजारो कैदी अनेक वर्षांपासून तुरुंगात खितपत पडले आहे. (Support for Poor Prisoner)

(हेही वाचा – Jaspal Rana : रायफल असोसिएशनच्या हाय परफॉर्मंन्स संचालकांनी जसपाल राणाला रेंज सोडून जायला का सांगितलं?)

५७४ कैद्यांना मिळणार जामीन

ज्या कैद्यांना जामीन झालेला आहे, आणि त्यांच्याकडे जामीनाची भरण्यासाठी जामीनाची रक्कम नाही अशा कैद्यासाठी केंद्र सरकारने ‘सपोर्ट फॉर पुअर प्रिझनर योजना’ सुरू केली आहे. या योजने अंतर्गत केंद्र सरकार राज्यातील तुरुंगात असलेल्या जामीन झालेल्या ५७४ कैद्यांना जामीन मिळवून देणार आहे. त्यासाठी १ कोटी ६० लाख रुपयांची निधी देण्यात येणार आहे. तसेच पालघर, अहमदनगर आणि हिंगोली जिल्ह्यात नवीन कारागृहांच्या बांधकामामुळे राज्यातील तुरुंगांची गर्दी कमी होण्यास मदत होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Support for Poor Prisoner)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.