रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीने काही दिवसांपूर्वी छापा टाकला होता. मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत लिलाव केल्याच्या प्रकरणी ईडी चौकशी केली होती. (Rohit Pawar Ed Summons) आता थेट रोहित पवारांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. यामध्ये त्यांना बुधवारी चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.
(हेही वाचा – Support for Poor Prisoner या योजनेअंतर्गत ५७४ कैद्यांना होणार लाभ)
5 जानेवारी रोजी मनी लॉन्ड्रींगचे कारण देत ईडीने बारामती अॅग्रो (Baramati Agro) कंपनीवर छापे घातले होते. या वेळी पुणे, बारामती आणि इतर ६ ठिकाणी ईडीने छापे घातले होते. रोहित पवार हे बारामती अॅग्रो कंपनीचे सीईओ आहेत. तर त्यांचे वडील राजेंद्र पवार हे संचालक आहेत.
शिखर बँकेकडून घेतले प्रचंड कर्ज
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक (Maharashtra State Co-operative Bank) घोटाळा प्रकरणी ईडीकडून हे छापे घालण्यात आले आहेत. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेने 2001 ते 2011 या काळात 23 सहकारी साखर कारखान्यांना तारण न घेता कर्जे दिली होती. नंतर ही कर्जे अनुत्पादक (एनपीए) मध्ये गेली. त्यानंतर ते कारखाने नेत्यांनी विकत घेतले. त्यासाठी पुन्हा शिखर बँकेनेच (Shikhar Bank) कर्जे दिली. यामध्ये बँकेला एकूण 2 हजार 61 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याच बँकेकडून बारामती ॲग्रोने मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले होते.
(हेही वाचा – BMC : मराठीतून एम. ए करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ)
गळीत हंगामाप्रकरणी विधान परिषदेपर्यंत पोहोचले प्रकरण
बारामती ॲग्रो कारखाना याआधीही चर्चेत आला होता. गळीत हंगाम सरकारने निश्चित केलेल्या वेळेच्या अगोदर सुरू करण्यात आला होता. या प्रकरणी विधान परिषदेचे भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी ऑक्टोबर महिन्यात तक्रार केली होती. विशेष म्हणजे विधान परिषदेमध्ये देखील लक्षवेधी क्रमांक 7 च्या अनुशंगाने त्यांनी मुद्दा उपस्थित केला होता. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. (Rohit Pawar Ed Summons)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community