Public Holiday : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर

राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या सुवर्ण क्षणाची सर्वच रामभक्त आतुरतेने वाट पाहात आहेत, तो सोहळा पाहता यावा, याकरिता महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

298
Public Holiday : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर
Public Holiday : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर

अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराच्या (Ram Mandir) ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यानिमित्त २२ जानेवारीला महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक सुट्टी (Public Holiday) जाहीर केली आहे. कॅबिनेट मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या सुवर्ण क्षणाची सर्वच रामभक्त आतुरतेने वाट पाहात आहेत, तो सोहळा पाहता यावा, याकरिता महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अयोध्येतील रामलल्लाच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा आणि मंदिर लोकार्पणाचा भव्य दिव्य आणि ऐतिहासिक सोहळा पाहता यावा यासाठी येत्या २२ जानेवारीला महाराष्ट्रातही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. छत्तीसगड, गोवा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांनी २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आली आहे.

(हेही वाचा – Ram Mandir: गर्भगृहात विराजमान रामलल्लाच्या चेहऱ्याचे पहिले छायाचित्र प्रसिद्ध, २३ जानेवारीपासून भाविकांना नवीन मंदिरात घेता येणार दर्शन)

गुरुवारी, केंद्र सरकारने २२ जानेवारी रोजी राम मंदिर अभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण भारतातील सर्व केंद्रीय सरकारी कार्यालयांमध्ये अर्धा दिवस काम करण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे, वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने सांगितले की, सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्था आणि प्रादेशिक ग्रामीण बँका २२ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंतच सुरू राहतील.

 Public holiday declared on 22nd January in Maharashtra in view of Ayodhya Ram Temple pranpratishtha pic.twitter.com/Iv9ZxNjJHX

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.