जपान येथील योकोहामा शहराचे आंतरराष्ट्रीय संपर्क विभागाचे आशिया खंड संचालक गोटो मासरू यांनी शुक्रवारी १९ जानेवारी २०२४ भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला (राणीबाग) (Veermata Jijabai Bhosale Botanical Udyan and Zoo) भेट दिली. उद्यानातील मियावाकी विभागातील वृक्षवल्लीविषयक माहिती मासरू यांनी यावेळी जाणून घेतली. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी त्यांना उद्यानाची आणि प्राणिसंग्रहालयाची माहिती दिली.
भारतातील मुंबई आणि जपानमधील योकाहामा ही दोन्ही शहरे सन १९६५ मध्ये भगिनी शहर संबंध (Sister City) या उपक्रमअंतर्गत जोडली गेली आहेत. या उपक्रमाला पुढील वर्षी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याअनुषंगाने जपानकडून या भेटीचे आयोजन करण्यात आले. तसेच येत्या वर्षभरात पर्यावरण जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मासरू यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील विविध ठिकाणी भेट दिली.
(हेही वाचा – Rohit Pawar Ed Summons : आता थेट रोहित पवारांना ईडीकडून समन्स; काय आहे प्रकरण )
प्रातिनिधीक स्वरुपात झाडांची लागवड
मागील वर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ५ जून २०२३ जपानचे राजदूत फुकहोरी यसुकता आणि मलेशियाचे राजदूत अहमद झुवेरी युसूफ यांनी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात प्रातिनिधीक स्वरुपात झाडांची लागवड केली. तसेच मुंबईतील पर्यावरणाच्या अनुषंगाने हाती घेण्यात आलेल्या पुढाकारांना त्यांनी पाठिंबा दर्शवला. त्यावेळी लागवड केलेल्या रोपांच्या ठिकाणीही मासरू यांनी भेट दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community