Stock Market News : एनएससी, बीएससी शनिवारी पूर्णवेळ चालणार, सोमवारी राहणार बंद 

सोमवारी २२ जानेवारीला घटनेच्या कलम २५ अंतर्गत सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी शेअर बाजारही बंद राहतील. 

233
Indian Stock Exchange : भारतीय शेअर बाजारांनी हाँग काँगलाही टाकलं मागे
Indian Stock Exchange : भारतीय शेअर बाजारांनी हाँग काँगलाही टाकलं मागे
  • ऋजुता लुकतुके

सोमवारी २२ जानेवारीला देशभर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्याअंतर्गत कलम २५ नुसार सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेनंही शुक्रवारी संध्याकाळी सरकारी रोखे बाजार, परकीय चलन व्यवहार, मनी मार्केट, मनी इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्ह्ज असे सर्व प्रकारचे बाजार बंद राहणार असल्याचं जाहीर केलं. (Stock Market News)

त्यानंतर लगेचच राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजार या दोन्ही शेअर बाजारांनीही सोमवारी २२ जानेवारीला सुटी जाहीर केली आहे. मनीकंट्रोल डॉट कॉम या वेबसाईने सर्वप्रथम ही बातमी दिली. (Stock Market News)

(हेही वाचा – Promotion of Tourism : लक्षद्वीपमध्ये सुट्टीचा आनंद घेणाऱ्यांना मिळेल ‘ही’ मजेशीर ऑफर)

पण, त्याचवेळी शनिवारी २० जानेवारीला शेअर बाजार सकाळी नऊ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यापूर्वी दोन्ही शेअर बाजार शनिवारी डीआर या नवीन साईटवर स्थलांतरित होत असल्यामुळे विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित करण्यात आलं होतं. आणि यात पाऊण तासाची दोन सत्र दिवसभरात होणार होती. पण, आता शनिवारी बाजाराची वेळ नियमित असेल, असं सांगण्यात येत आहे. (Stock Market News)

आणि शनिवारी कामकाजाच्या वेळात कॅश तसंच डिलिव्हरी म्हणजे रोख तसंच वायदे बाजारही सुरू राहील. (Stock Market News)

सोमवारी २२ तारखेला मात्र शेअर बाजारांना सुटी असेल. आणि त्या दिवशीच्या राहिलेल्या सेटलमेंट मंगळवारी २३ तारखेला होतील. २२ तारखेला अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळाही होणार आहे. (Stock Market News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.