CM Eknath Shinde : ३ लाख ५३ हजार कोटींपेक्षा जास्त सामंजस्य करार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक करण्याचा ओढा मोठ्या प्रमाणात दिसून आला असून या वर्षी ३ लाख ५३ हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे सामंजस्य करार स्वाक्षांकित झाले आहेत.

197
Eknath Shinde उद्यान मंदिर, शिवाजी पार्क ते भोईवाडा राम मंदिर शोभयात्रेत सहभाग
Eknath Shinde उद्यान मंदिर, शिवाजी पार्क ते भोईवाडा राम मंदिर शोभयात्रेत सहभाग

दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक करण्याचा ओढा मोठ्या प्रमाणात दिसून आला असून या वर्षी ३ लाख ५३ हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे सामंजस्य करार स्वाक्षांकित झाले आहेत. त्याचप्रमाणे जवळपास एक ते दीड लाख कोटी रुपयांचे आणखी सामंजस्य करार स्वाक्षरीत होण्यासाठी परदेशी कंपन्यांनी स्वारस्य दाखविले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शुक्रवारी दिली. (CM Eknath Shinde)

जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि राज्य तसेच केंद्र शासनाचे शिष्टमंडळ १५ जानेवारीला दावोस येथे गेले होते. तेथून परतल्यानंतर शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. (CM Eknath Shinde)

अमेरिका, स्वित्झर्लंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया या देशांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून यूएई, ओमान या देशांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास पसंती दर्शवली आहे. त्याचबरोबर आर्सेलर मित्तल, जिंदाल, गोदरेज, अदानी या कंपन्यांनी सुद्धा महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे एकंदरीतच दावोस दौरा यशस्वी झाल्याचा दावा शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केला. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Veermata Jijabai Bhosale Botanical Udyan and Zoo: जपानच्या पर्यावरण अभ्यासकाची राणीबागेला भेट)

गेल्या वर्षी दावोस येथे झालेल्या सामंजस्य करारांपैकी ७५ ते ८० टक्के करार कागदावर न राहता प्रत्यक्षात आले. या करारामुळे दोन लाखांपेक्षा जास्तीचे रोजगार निर्माण होणार आहेत . जेम्स आणि ज्वेलरी, माहिती तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन, हरित ऊर्जा, पेपर आणि पल्प, खाण उद्योग अशा अनेक उद्योजकांनी डेटा सेंटर, इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. जेम्स आणि ज्वेलरी उद्योगात एक लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण होणार असल्याचे शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले. (CM Eknath Shinde)

केंद्र आणि राज्य सरकारच्या समविचारी संबंधामुळे उद्योजक हे आत्मविश्वासाने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुंतवणूक करत असल्याचा अनुभव मिळाला. राज्यात पायाभूत सुविधा, दळणवळणाच्या उत्तम सुविधा, कुशल मनुष्यबळ असून महाराष्ट्रात एक इको सिस्टिम आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे दूरदृष्टी, डॉयनॅमिक लिडरशीप, ग्लोबल लिडर म्हणून त्यांची ओळख झाली असल्याचे दावोस दौऱ्यात अनेक देशातील लोकांनी सांगितले. नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे नाव जगभरात असून त्यांचे नाव लोक आदराने घेतात. परदेशी गुंतवणुकीसाठी याचाही फायदा महाराष्ट्राला झाल्याचे शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.