Facebook : फेसबुकने सर्वात आधी ‘या’ मुलीला नोकरीवर ठेवले होते. कोण आहे ही मुलगी?

रुची संघवी एक भारतीय संगणक अभियंता आणि व्यावसायिक महिला आहे. फेसबुकने नियुक्त केलेली ती पहिली महिला अभियंता होती. २०१० मध्ये तिने फेसबुला रामराम केले आणि २०११ मध्ये तिने इतर दोन सह-संस्थापकांसह तिची स्वतःची कंपनी Cove सुरू केली.

250
I Just Want Money : फेसबुकने काढून टाकलेला कर्मचारी आता कमावतोय वर्षाला २७ कोटी
I Just Want Money : फेसबुकने काढून टाकलेला कर्मचारी आता कमावतोय वर्षाला २७ कोटी

मार्क झुकरबर्ग यांचे फेसबुक खरे तर आपल्या जीवनशैलीचा भाग आहे. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी फेसबुक चाळणे हा जणू नियम झाला आहे. पण तुम्हाला माहितीय का की, फेसबुकने सर्वात आधी कोणत्या अभियंत्याला कामावर ठेवले होते? नाही ना? मग आम्ही सांगतो. तिचं नाव आहे रुची सांघवी. (Facebook)

रुची संघवी एक भारतीय संगणक अभियंता आणि व्यावसायिक महिला आहे. फेसबुकने नियुक्त केलेली ती पहिली महिला अभियंता होती. २०१० मध्ये तिने फेसबुला रामराम केले आणि २०११ मध्ये तिने इतर दोन सह-संस्थापकांसह तिची स्वतःची कंपनी Cove सुरू केली. २०१२ मध्ये ही कंपनी ड्रॉपबॉक्सला विकली आणि ती व्हीपी ऑफ ऑपरेशन्स म्हणून ड्रॉपबॉक्समध्ये सामील झाली. ऑक्टोबर २०१३ मध्ये तिने ड्रॉपबॉक्सलादेखील सोडचिठ्ठी दिली. २०१६ मध्ये तिने साऊथ पार्क कॉमन्सची स्थापना केली. (Facebook)

(हेही वाचा – Raj Bhavanमधील श्रीराम मंदिर बांधकाम पूर्ण, सोमवारी प्राणप्रतिष्ठा)

रुची सांघवीचा जन्म २० जानेवारी १९८२ मध्ये पुण्यात झाला. रुचीचे पालनपोषण पुण्यात झाले. रुचीने Carnegie Mellon University मधून इलेक्ट्रिकल कॉम्प्युटर इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर आणि पदव्युत्तर पदवी घेतली. ती सिलिकॉन व्हॅलीच्या अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूकदार आणि सल्लागार आहे. ती आता UCSF च्या बोर्डावर आहे आणि पूर्वी ती पेटीएमच्या संचालक मंडळावर होती. (Facebook)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.