Fareed Zakaria: पद्मभूषण, भारतीय-अमेरिकन पत्रकार आणि लेखक फरीद रफिक झकारिया

झकेरिया यांनी मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी १९८६ मध्ये Yale विद्यापीठातून कला शाखेची पदवी प्राप्त केली. ते Yale पॉलिटिकल युनियनचे अध्यक्ष होते.

173
Fareed Zakaria: पद्मभूषण, भारतीय-अमेरिकन पत्रकार आणि लेखक फरीद रफिक झकारिया
Fareed Zakaria: पद्मभूषण, भारतीय-अमेरिकन पत्रकार आणि लेखक फरीद रफिक झकारिया

फरीद रफिक झकारिया (Fareed Zakaria) हे भारतीय-अमेरिकन पत्रकार, राजकीय भाष्यकार आणि लेखक आहेत. ते CNN’s Fareed Zakaria GPSचे होस्ट आहेत आणि वॉशिंग्टन पोस्टसाठी साप्ताहिक स्तंभ लिहितात. ते ‘न्यूजवीक’चे स्तंभलेखक, न्यूजवीक इंटरनॅशनलचे संपादक आणि टाइमचे प्रमुख संपादक आहेत.

फरीद झकेरिया यांचा जन्म मुंबईत २० जानेवारी १९६४ रोजी एका कोकणी मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे वडील, रफिक झकारिया हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये होते आणि ते इस्लामचे धर्मशास्त्रज्ञदेखील होते. त्यांची आई फातिमा झकारिया म्हणजेच त्यांच्या वडिलांची दुसरी पत्नी संडे टाइम्स ऑफ इंडियाची संपादक होती.

(हेही वाचा – ISRO: चांद्रयान-3चे विक्रम लँडर जगभरातील चांद्र मोहिमांना मार्गदर्शन करेल, इस्रोची माहिती)

हार्वर्ड विद्यापीठातून सरकारी विषयात पीएचडी
झकेरिया यांनी मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी १९८६ मध्ये Yale विद्यापीठातून कला शाखेची पदवी प्राप्त केली. ते Yale पॉलिटिकल युनियनचे अध्यक्ष होते, Yale पॉलिटिकल मंथलीचे मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे. त्याचबरोबर Scroll and Key society सोसायटीचे सदस्य आणि Party of the Right चे सदस्यही ते होते. पुढे त्यांनी १९९३ मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून सरकारी विषयात पीएचडी मिळवली. झकारिया हे लिबरल विचारांचे मानले जातात. त्यांना National Magazine Award मिळाला आहे. २०१० मध्ये भारत सरकारने त्यांना पत्रकारितेसाठी पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.