Nagpur Crime : घरफोडी करणाऱ्या बांगलादेशीय टोळीचा पर्दाफाश; दोघेजण पोलिसांच्या ताब्यात

घरफोडी करणाऱ्या आंतरदेशीय टोळीचा पर्दाफाश करण्यात गुन्हेशाखेच्या युनिट चारला यश आले आहे.पोलिसांनी यातील दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून १२ लाख ६६ हजार रुपये किमतीचे २११ ग्राम सोने जप्त केले.

154
Mumbai Crime : मुंबईत घरफोडीचे ५३१ गुन्हे दाखल

नागपूरमध्ये घरफोडी करणाऱ्या आंतरदेशीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यात दोघांना अटक करण्यात आली आहे.घरफोडी करणाऱ्या आंतरदेशीय टोळीचा पर्दाफाश करण्यात गुन्हेशाखेच्या युनिट चारला यश आले आहे.यातील दोन आरोपी तर चक्क बांगलादेशमधून भारतात आले आहेत.त्यानंतर त्यांनी घरफोड्यांची ही टोळी तयार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.मुंबई पोलिसांनी यातील दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून १२ लाख ६६ हजार रुपये किमतीचे २११ ग्राम सोने जप्त केले. (Nagpur Crime)
मोल्ला मुस्ताक मोजहार (४०) आणि उज्जल चिरंजन पत्रा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. यापैकी मोल्ला बांगलादेश येथील रहिवासी आहे.याशिवाय शेख बाबू दाऊद शेख(४०) आणि समशेर हे फरार आहे.  आधिक माहितीनुसार ६ जानेवारीला बजरंगनगर येथील सिद्धेश्वर सभागृहाजवळ राहणारे सुनील तिमांडे(६३) यांच्या घरात चोरटयांनी शिरून ९९ तोळे सोने आणि रोख रक्कम माल चोरून नेल्याची तक्रार अंजनी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्याचा समांतर तपास करत असताना पोलीस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश जायभाये यांच्या पथकाने सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून मोल्ला नावाचा व्यक्ती साथीदारांसह चोऱ्या करत असल्याची बाब समोर आली आहे. (Nagpur Crime)

(हेही वाचा : Facebook : फेसबुकने सर्वात आधी ‘या’ मुलीला नोकरीवर ठेवले होते. कोण आहे ही मुलगी?)

तो आला असल्याची माहिती कळताच पथकाने त्याला मुंबईतून ताब्यात घेतले. तपासात तो बांगलादेशी असल्याची माहिती समोर आली आहे. तो साथीदार शेख दाऊद हे दोघेही सहा ते सात महिन्यापूर्वी अवैधरीत्या देशात दाखल झाल्याची माहिती पथकाला मिळाली.त्यानंतर ते आधी गुजरात आणि मग मुंबई मध्ये स्थायिक झाले. त्यांच्यासोबत उज्ज्वल आणि समशेर यांनी एकत्र येत घरफोडी करण्याचे सत्र सुरू केले. नागपूर मध्ये घरफोडी केल्याची बाब तपासा दरम्यान उघडकीस आली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.