Ayodhya Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशातील ५०६ राज्यअतिथी उपस्थित राहणार ; जाणून घ्या कोण आहेत निमंत्रणाच्या यादीत

अवघ्या एका दिवसावर हा सोहळा आला आहे. यावेळी सुमारे ८००० लोकांना आंमत्रित करण्यात आले आहे. तर ५०६ लोकांना राज्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

246
Ayodhya Ram Mandir : राज्यात ७५ लाखाहून आधिक घरात पोहोचल्या अक्षता; गर्भगृहात पूजाविधीसाठी ११ जोडप्यांची निवड

अयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा उत्सवासाठी जगभरातून अनेक लोक या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत. या सोहळ्याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.अवघ्या एका दिवसावर हा सोहळा आला आहे. यावेळी सुमारे ८००० लोकांना आंमत्रित करण्यात आले आहे. तर ५०६ लोकांना राज्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. (Ayodhya Ram Mandir)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा उत्सवासाठी सर्व क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. राज्याच्या पाहुण्यांचे स्वागत तसेच राहाण्याची व्यवस्था, जेवण आणि इतर आवश्यक व्यवस्थांसाठी नियोजन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,५०६राज्य पाहुण्यांपैकी अनेकांनी अयोध्येत येण्यासाठी संमती दिली आहे.  (Ayodhya Ram Mandir)

सर्वक्षेत्रातील नामवंत व्यक्तींना निमंत्रण
देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा, रिलायन्सचे मुकेश अंबानी, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली, मेगास्टार अमिताभ बच्चन, उषा मंगेशकर, अनुपम खेर, माधुरी दीक्षित, अक्षय कुमार, वेटलिफ्टर कर्णम मल्लेश्वरी, ऑलिम्पियन पी. टी. उषा यांच्यासह अनेक लोकांना राज्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. राज्याच्या पाहुण्यांच्या सुव्यवस्थित व्यवस्थेसाठी उत्तर प्रदेश सरकार योग्य ती तयारी करत आहे.

(हेही वाचा : Ram Mandir : प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याकरिता ७००० किलो ‘राम हलवा’

ऐतिहासिक कार्यक्रम भव्य, दिव्य आणि सुरक्षित पार पडण्याची तयारी पूर्ण
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की,या सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या धाम, उत्तर प्रदेश आणि देशात उत्साहाचे वातावरण आहे. अनेक शतकांनंतर येणारा हा क्षण पाहण्यासाठी भाविक आतुर झाले आहे. भारताचा विश्वास आणि अभिमान पुन्हा प्रस्थपित करण्याचा हा कर्यक्रम आहे. उत्तम समन्वय, स्थानिक पातळीवर ट्रस्टशी समन्वय, सुविधा, वाहतूक,सुरक्षा आदींच्या माध्यमातून २२ जानेवारीचा ऐतिहासिक कार्यक्रम भव्य, दिव्य आणि सुरक्षित पार पडण्याची तयारी पूर्ण झाली असल्याचे योगी म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.