Australian Open 2024 : नोवाक जोकोविच दिमाखात अंतिम सोळामध्ये दाखल

यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत तिसऱ्या फेरीतील सामना नोवाक जोकोविचचा शंभरावा सामना होता. 

262
Australian Open 2024 : नोवाक जोकोविच दिमाखात अंतिम सोळामध्ये दाखल
Australian Open 2024 : नोवाक जोकोविच दिमाखात अंतिम सोळामध्ये दाखल
  • ऋजुता लुकतुके

अव्वल खेळाडू नोवाक जोकोविचला (Novak Djokovic) ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये प्रतिस्पर्ध्यांनी पाच सेटपर्यंत झुंजवलं होतं. पण, तिसऱ्या फेरीचा सामना त्याचा विक्रमी स्पर्धेतील शंभरावा सामना होता. आणि इतं मात्र त्याला सूर गवसला. ६-३, ६-३ आणि ७-६ असा हा सामना जिंकताना प्रतिस्पर्धी थॉमस एचवेरीला त्याने सामन्यात संधीही दिली नाही. यापूर्वी १० वेळा ही स्पर्धा जिंकलेला जोकोविच (Novak Djokovic) आता दुसऱ्या आठवड्यातही स्पर्धेत टिकून राहणार आहे. (Australian Open 2024)

जोकोविचला (Novak Djokovic) स्पर्धेच्या पहिल्या आठवड्यात सर्दी आणि बरोबर तापाचा त्रास होतोय. त्यामुळे आताही सामन्यात प्रत्येक ब्रेकला तो नाक पुसताना दिसला. पण, तरीही जिगर कायम ठेवत त्याने पहिल्या दोन फेऱ्या जिंकल्या आहेत. ‘तिसऱ्या फेरीचा सामना अप्रतिम होता. आतापर्यंतचा या स्पर्धेतील सगळ्यात चांगला खेळ मी करू शकलो. सामनाभर माझी ताकद टिकून राहिली याचा मला आनंद आहे,’ असं जोकोविच (Novak Djokovic) सामन्यानंतर बोलताना म्हणाला. (Australian Open 2024)

(हेही वाचा – Australian Open 2024 : रोहन बोपान्ना, मॅथ्यू एबडन ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत )

चेवेरीबरोबरचा हा सामना २ तास आणि २० मिनिटांत संपला. जोकोविचने (Novak Djokovic) संपूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवताना एकही ब्रेक पॉइंट प्रतिस्पर्ध्याला दिला नाही. म्हणूनच तो सामन्यानंतर खुश होता. पहिल्या दोन्ही सेटमध्ये जोकोविचने अगदी सुरुवातीलाच प्रतिस्पर्ध्याची सर्व्हिस भेदून आघाडी मिळवली. आणि सेटही आरामात जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये एचवेरीने टायब्रेकरपर्यंत सामना खेचला. पण, पुन्हा एकदा वर्चस्व गाजवत जोकोविचने (Novak Djokovic) टायब्रेकर ६-२ असा जिंकला. (Australian Open 2024)

यंदा या स्पर्धेतून आपलं २५ वं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने जोकोविच (Novak Djokovic) मैदानात उतरला आहे. आणि चौथ्या फेरीत त्याची गाठ विसावा मानांकित फ्रेंच खेळाडू ॲड्रियन मॅनेरिनोशी पडणार आहे. (Australian Open 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.