Indian Army : भारत-पाक युद्धात महापराक्रम गाजवलेला ‘रणगाडा’ कुडाळात दाखल

हा रणगाडा १९७१ च्या भारत-पाक युद्धात महापराक्रम गाजवलेल्या रणगाड्यापैकी एक रणगाडा आहे.

228
Indian Army : भारत-पाक युद्धात महापराक्रम गाजवलेला 'रणगाडा' कुडाळात दाखल
Indian Army : भारत-पाक युद्धात महापराक्रम गाजवलेला 'रणगाडा' कुडाळात दाखल

भारत आणि पाकिस्तानमध्ये १९७१ साली झालेल्या युद्धामध्ये महापराक्रम गाजवलेल्या टी-५५ या रणगाड्याचे येथील सीबीएसई बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये शनिवारी (२० जानेवारी) आगमन झाले. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांना भारतीय सेनेने (indian Army) गाजवलेल्या महापराक्रमाची माहिती व्हावी, त्यांना भारतीय सैन्याच्या शस्त्र सामग्रीचे ज्ञान मिळावे, म्हणून भारतीय थल सेनेकडे रणगाड्याची (Tank-५५) मागणी केली होती.

भारतीय थलसेनेकडून बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचा प्रस्ताव मंजूर झाला. हा रणगाडा १९७१ च्या भारत-पाक युद्धात महापराक्रम गाजवलेल्या रणगाड्यापैकी एक रणगाडा आहे. शनिवारी, आर्मी विभागाच्या खडकी-पुणे येथून तो दुपारी ३ वाजता निघून रविवारी सकाळी ७ वाजता फोंडा (ता. कणकवली) येथे व तेथून कणकवली, कसाल, ओरोस, हुमरमळा, कुडाळ येथे पोहोचेल.

(हेही वाचा – Republic Day Programme : यंदाचे प्रजासत्ताक दिनाचे संचलन महिला केंद्रीत असणार – संरक्षण सचिव गिरीधर अरमाने )

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एनसीसीच्या विद्यार्थ्यांकडून रणगाड्याचे स्वागत करण्यात येईल. त्यानंतर बाजारपेठमार्गे एमआयडीसीमधील बॅ. नाथ पै सेन्ट्रल स्कूल (सी.बी.एस.ई) येथे उतरविण्यात येईल, अशी माहिती बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.