Arvind Kejriwal : हिंदुंची मते मिळविण्यासाठी केजरीवाल यांची ‘रामलीला’

अरविंद केजरीवाल यांचा लोकसभेच्या निवडणुकीत दिल्लीतील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे त्यांनी अशाप्रकारच्या आयोजनाची तयारी केली आहे.

190
Arvind Kejriwal ईडीच्या चौकशीला सातव्यांदा अनुपस्थित

भारतासह अख्ख्या जगातील लोकांच्या नजरा अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा समारोहाकडे लागल्या आहेत. परंतु, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना या ऐतिहासिक क्षणीसुध्दा मतांचे गलिच्छ राजकारण करणार आहेत. २२ जानेवारी रोजी अध्योध्येत प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पाचशे वर्षांच्या प्रतिक्षेनंतर हिंदु भाविकांच्या आयुष्यात हा क्षण आला आहे. यामुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपले कर्तव्य पार पाडल्यामुळे याचे श्रेय अर्थातच भाजपला जाणार आहे. (Arvind Kejriwal)

दिल्लीतील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

यामुळे लोकसभेच्या आगामी निवडणुकीत (Lok Sabha Elections) दिल्लीतील सर्व सातही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता बळावली आहे. म्हणूनच दिल्लीचे मुख्यमंत्री (Arvind Kejriwal) विचलित झाले आहेत. म्हणून आम आदमी पक्षाने आज शनिवारपासून ‘सुंदरकांड’ आणि हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम तीन दिवस चालणार असून दिल्लीतील प्रत्येक वार्डात सुंदरकांड आणि हनुमान चालीसाचा कार्यक्रम होणार आहे. मुळात, अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Elections) दिल्लीतील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे त्यांनी अशाप्रकारच्या आयोजनाची तयारी केली आहे. येत्या सोमवारी प्यारेलाल भवन येथे होणाऱ्या रामलीला कार्यक्रमात मुख्यमंत्री केजरीवाल (Arvind Kejriwal) हजर राहणार आहेत. (Arvind Kejriwal)

(हेही वाचा – FIH Olympic Qualifier : भारतीय महिला हॉकी संघाचं ऑलिम्पिक पात्रतेचं स्वप्न भंगलं)

हे कलावंत रामलीला सादर करणार

दुसरीकडे, केंद्र सरकारच्या (Central Govt) भारतीय सांस्कृतिक परिषदेने दिल्लीतील पुराना किल्ला येथे आंतरराष्ट्रीय रामायण मेळाव्याचे आयोजन केले आहे. गुरूवारपासून सुरू झालेला हा कार्यक्रम उद्या रविवारपर्यंत चालणार आहे. महत्वाचे म्हणजे, यात श्रीलंका, सिंगापूर, कंबोडिया, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया आणि रशियातील कलावंत रामलीला सादर करणार आहेत. आम आदमी पक्षाची सुध्दा भगवान श्रीरामावर अपार श्रध्दा आहे हे दाखविण्यासाठी केजरीवाल यांच्याकडून त्रिदिवसीय रामलीलाचे आयोजन केले जात आहे. हे खरे असले तरी लोकसभेच्या निवडणुकीत दिल्लीतील हिंदुं मतांना आकर्षित करणे हा त्यामागचा खरा हेतू आहे, हे येथे उल्लेखनीय. (Arvind Kejriwal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.