Dhruv Jerel : दुपारची झोप घेत असताना खणाणलेला फोन बीसीसीआयचा होता. आणि मग…

ध्रुव जुरेल पूर्वी भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार राहिलेला आहे.

1190
Dhruv Jerel : दुपारची झोप घेत असताना खणाणलेला फोन बीसीसीआयचा होता. आणि मग…
Dhruv Jerel : दुपारची झोप घेत असताना खणाणलेला फोन बीसीसीआयचा होता. आणि मग…
  • ऋजुता लुकतुके

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर झाला तेव्हा एकमेव नाव थोडसं आश्चर्य निर्माण करणारं होतं. कोना भरत, के एल राहुल, ईशान किशन, संजू सॅमसन, जितेन शर्मा अशा आधीच संघात स्थान पक्कं करण्यासाठी झगडणाऱ्या यष्टीरक्षकांची संघात येण्यासाठी रांग लागलेली असताना निवड समितीने रांगेत आणखी एक यष्टीरक्षक उभा केला. आणि तो होता आग्र्याचा ध्रुव जेरेल. (Dhruv Jerel)

कारगील युद्धाचा अनुभव असलेले चांद जुरेल यांचा २० वर्षीय मुलगा ध्रुव जुरेल. (Dhruv Jerel) ‘विराट आणि रोहित यांच्याबरोबर तो भारतीय संघात खेळणार आहे,’ असं आग्रा कॅन्टॉनमेंटमध्ये अभिमानाने सध्या म्हटलं जातं. आयपीएलमध्ये ध्रुव राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. याच संघातील एक खेळाडू रिंकू सिंग सध्या टी-२० क्रिकेट गाजवतोय. पण, ध्रुवला कसोटीसाठी बोलावणं आलंय. (Dhruv Jerel)

(हेही वाचा – Arvind Kejriwal : हिंदुंची मते मिळविण्यासाठी केजरीवाल यांची ‘रामलीला’)

‘कसोटी हेच क्रिकेटचं मूलभूत रुप आहे. तिथेच तुमचा कस लागतो. आताही दक्षिण आफ्रिका दौऱ्यात मी भारतीय ए संघाकडून कसोटी खेळलो. इंग्लंडच्या एक संघाविरुद्ध खेळलो. दोन्हीकडे मी एकेक अर्धशतक केलं. माझ्या कामगिरीवर मी समाधानी आहे. रोहित, विराट, ज्यांना बघत मोठा झालो, त्यांच्याबरोबर खेळणार याचा अभिमान आहे,’ असं ध्रुव टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाला. (Dhruv Jerel)

गंमत म्हणजे भारतीय संघात निवड झाली तेव्हा तो झोपलेला होता. ‘संघ निवड उशिरा जाहीर झाली. तशी अपेक्षाही नव्हती. त्यामुळे दिवसभर दमून मी झोपलो होतो. अचानक फोन वाजायला सुरुवात झाली. मी आधी फोन घेऊ शकलो नाही. पण, मेसज बघितला तर माझी निवड झाल्याचं बीसीसीआयने कळवलं होतं,’ ध्रुवने निवड झाल्याचा क्षण मीडियासमोर पहिल्यांदा सांगितला. (Dhruv Jerel)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.