अयोध्येत श्रीराम मंदिर मंदिरात होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. देशभरात सर्वत्र प्रभु रामचंद्रांच्या आगमनाची तयारी सुरू आहे. उत्साहाने भारलेल्या मंगलमय वातावरणात ‘मुंबईतील डबेवाले’ही अनोख्या पद्धतीने २२ जानेवारीला दिवाळी साजरी करणारा आहेत. (Mumbai Dabbawala)
याविषयी मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले की, ‘राम आमचा श्वास आहे. राम आमचा ध्यास आहे. आम्ही डबेवाले एकमेकांना भेटलो की, अभिवादन करताना ‘रामकृष्ण हरी’ मंत्र म्हणतो. या मंत्रामध्येही राम आहे. राम सर्वव्यापी आहेत. त्यांचे भव्यदिव्य मंदिर अयोध्येत जन्मभूमीवर साकारते आहे. याचा मला आनंद आहे. गेल्या ५२५ वर्षे सुरू असलेला वाद मिटला, याचा आनंद प्रत्येक हिंदुला आहे.
(हेही वाचा – IPL 2024 : टाटा सन्सच पुढील पाच वर्षांसाठी आयपीएलचे टायटल प्रायोजक)
मथुरा, काशी ही तीर्थस्थळेही मुक्त होतील…
विदेशी आक्रमकांनी हिंदूंची प्रमुख श्रद्धास्थाने अयोध्या, मथुरा, काशी येथील मंदिरे उद्ध्वस्त केली आणि तेथे मशिदी बांधल्या. अयोध्या आता मुक्त झाली आहे. रामजन्मभूमीवर मंदिर उभे राहिल्यामुळे आता आम्हाला पुढचे वेध लागले आहेत. ते म्हणजे मथुरा, काशी ही तीर्थस्थळेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुक्त होतील. २२ जानेवारीला डबेवाले पुन्हा एकदा दिवाळी साजरी करणारा आहेत. ‘याची देही याची डोळा’ रामजन्मभूमीमध्ये साजरा होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहायला मिळणार हे आमचे भाग्य आहे, अशा भावपूर्ण प्रतिक्रिया तळेकर यांनी व्यक्त केल्या.
फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा
या दिवशी केल्या जाणाऱ्या तयारीबाबत त्यांनी सांगितले की, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी प्रत्येक डबेवाला आपल्या घरावर रामध्वज लावणार आहेत. प्रत्येक डबेवाला त्याच्या दारासमोर गुढी उभारणार असून दारात सडारांगोळी, दिव्यांची आरास केली जाणार आहे. घरी गोडाधोडाचं जेवण करून फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करणार असल्याचे मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.
हेही पहा –