- सुजित महामुलकर
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी शनिवारी महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचे स्पष्ट संकेत दिले लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी ३५-३६ जागांवर एकमत झाल्याचे सांगतानाच अजून जवळपास बारा जागांवरून आघाडीचे ‘बारा’ वाजणार असल्याचे असल्याची अप्रत्यक्ष कबुली पवार यांनी दिली. (Mahavikas)
अन्य जागांवर चर्चा सुरूच
शनिवारी (Saturday) झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे लोकसभा (Lok Sabha) जागावाटपाचे सूत्र (Seat Sharing Formula) ठरले का या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले की, “मी तर चर्चेत नाहीये पण जे चर्चेच्या प्रक्रियेत होते त्या आमच्या सहकाऱ्यांनी मला रिपोर्टिंग केले, त्याप्रमाणे ४८ जागा आहे त्यातील जवळपास ३५-३६ जागांवर एकमत आहे आणि बाकीच्यांची चर्चा चालू आहे.” (Mahavikas)
(हेही वाचा – IPL 2024 : टाटा सन्सच पुढील पाच वर्षांसाठी आयपीएलचे टायटल प्रायोजक)
बिघाडी नको
तर राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर (Solapur) लोकसभेत चाचपणी करत असल्याबाबत विचारले असता, “आज आम्ही सांगू शकत नाही पण अजून सोलापूरबाबत चर्चा झाली नाही. निश्चितच या जिल्यात आम्हाला अधिक लक्ष घालायला संधी आहे, असं वाटतं. पण आघाडीत बिघाडी होईल, असं आम्ही काही होऊ देणार नाही,” असे सांगून ३६ व्यतिरिक्त उर्वरित १२ जागांवर महाविकास आघाडीचे ‘बारा’ वाजणार असल्याचे संकेत दिले. (Mahavikas)
आघाडी समूहाचा एक उमेदवार
पवार यांना भाजप नेतृत्वातील महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीचा एक उमेदवार उभा करण्याची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, “आमची अशी इच्छा आहे की शेतकरी कामगार पक्ष (PWP), कम्युनिस्ट पक्ष (Communist Party) त्याच्याबरोबर वंचित (Vanchit) संघटना आहे, त्यांना सोबत घेऊन महाविकास आघाडी समूहाच्या वतीने उमेदवार उभे करण्याची कल्पना होती.” (Mahavikas)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community