देशभरात सध्या अयोध्येतील राम मंदिर (Ayodhya) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. मंदिराचे भव्यदिव्य बांधकाम हे पारंपरिक आणि भारतीय वास्तुकलेचे मिश्रण आहे. यामुळे शतकानुशतके हे मंदिर असेच उभे राहणार आहे. मंदिराचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण असून यासाठी ‘इस्रो’नेही मदत केली आहे.
मंदिर एक हजार वर्षांहून अधिक काळ टिकेल, असे बांधले आहे. या मंदिराकरिता देशभरातील शास्त्रज्ञांचे योगदान आहे याशिवाय इस्रोने मंदिर उभारणीकरिता लक्षणीय भूमिका बजावल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली आहे.
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir लोकार्पण सोहळ्यावर ‘जैश-ए-मोहम्मद’ ने केले वादग्रस्त विधान; म्हणाले… )
मंदिराची रचना…
अयोध्येतील राम मंदिराची रचना चंद्रकांत सोमपुरा यांनी नागरा शैलीनुसार केली आहे. उत्तर भारतातील मंदिरांमध्ये अशा पद्धतीची रचना असते. चंद्रकांत सोमपुरा यांचे कुटुंब गेल्या १५ पिढ्या हे काम करत आहे. या कुटुंबाने १००हून अधिका मंदिरांची रचना केली आहे. हे राम मंदिर स्थापत्त्यशास्त्राच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट आहे. पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्या याआधी इतकी भव्य निर्मिती क्वचितच साकारली असेल, असेही ते म्हणाले.
लोखंड किंवा स्टीलचा वापर नाही
मंदिराच्या क्षेत्रफळाविषयी सांगताना नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, मंदिराचे एकूण क्षेत्रफळ २.७ एकर आहे. मंदिरात लोखंड किंवा स्टीलचा वापर करण्यात आलेला नाही.याचे कारण म्हणजे लोहाचे (लोखंडाचे) आयुष्य ८०-९० वर्षे असते. मंदिराची उंची १६१ फूट किंवा कुतुबमिनारच्या उंचीच्या सुमारे ७० टक्के असेल. ५७,०००चौरस फुटांवर हे बांधकाम विस्तारलेले आहे. (बांधकामाचे क्षेत्र)
उत्तम दर्जाचे सिमेंट आणि चुना…
बांधकामाकरिता उत्कृष्ट दर्जाचे ग्रॅनाइट, सँडस्टोन आणि संगमरवर वापरण्यात आले आहे. याकरिता सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्युट, रुरकीचे संचालक डॉ. प्रदीप कुमार रामनचर्ला यांनी मंदिराच्या बांधकामाचे वर्णन केले असून त्यांच्या मंदिर बांधकाम प्रकल्पात सक्रीय सहभाग आहे. मंदिराकरिता उत्तम दर्जाचे सिमेंट किंवा चुन्याचा वापर करण्यात आला आहे.
वालुकामय जमिनीवर शास्रज्ञांनी शोधला वैशिष्ट्यपूर्ण उपाय
मंदिराच्या खालची जमीन वालुकामय आणि अस्थिर होती, कारण त्या परिसरात एका ठिकाणी शरयू नदी वाहात होती. यावर शास्त्रज्ञांनी एक वैशिष्ट्यपूर्ण उपाय शोधून काढला. शास्त्रज्ञांनी प्रथम मंदिराच्या संपूर्ण परिसराची माती १५ मीटर खोलीपर्यंत खणली. या भागात १२ ते १४ मीटर खोलीपर्यंत इंजिनीयर्ड माती टाकण्यात आली होती. यामध्ये कोणत्याही स्टीलच्या री-बारचा वापर करण्यात आलेला नाही, अशी माहिती नृपेंद्र मिश्रा यांनी दिली आहे.
हेही पहा –