सध्या देशभरात अयोध्यातील श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाच्या सोहळ्याची धामधूम सुरु आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अशा वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी या सर्व सोहळ्याच्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात रामराज्याची स्थापना करायची आहे, असे सांगत पंतप्रधान मोदी यांना अपेक्षित रामराज्य काय आहे, हे सांगितले. ठाण्यात रामायण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पंतप्रधान मोदी यांनी दहशतवाद मुक्त भारत, गरिबीमुक्त भारत, घराणेशाही मुक्त भारत, आत्मनिर्भर भारत, एक भारत श्रेष्ठ भारत म्हणजे रामराज्य अशी संकल्पना मांडली आहे. रामराज्य म्हणजे सुशासन, पारदर्शकता आणि वसुधैव कुटुंबकम याचा एकत्रित विचारच. कर्तव्य, श्रमप्रतिष्ठा, कर्मभाव, प्रयत्नवाद म्हणजे रामराज्य. ऋषी मुनी यज्ञ आणि कर्मकांड करत होते, तेव्हा राक्षस त्यांना त्रास देत असत. त्यावेळी ऋषी मुनींनी राजा दशरथाला श्रीरामाला पाठवण्याची विनंती केली त्यानुसार श्रीरामाने राक्षसांना ठार केले. याचाच अर्थ दहशतवादापासून मुक्तीची सुरुवात ही प्रभू श्रीरामांनी केली. राक्षसांचा नायनाट केला आणि सज्जनशक्तींना त्रास देणाऱ्यांना वाचवले, असेही फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले. ज्यांच्या मनात राम आहे, ज्यांच्या कामात राम आहे आणि त्यांच्याच हातून चांगले काम होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेच करुन दाखवले, असेही ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community