Wicket Keepers in Race : भारताच्या टी-२० विश्वचषकासाठीच्या संघात यष्टीरक्षकाच्या जागेसाठी जोरदार चुरस

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही के एल राहुललने यष्टीरक्षण केलं होतं. पण, टी-२० संघात तो निवड समितीच्या पसंतीस उतरलेला नाही. 

225
Wicket Keepers in Race : भारताच्या टी-२० विश्वचषकासाठीच्या संघात यष्टीरक्षकाच्या जागेसाठी जोरदार चुरस
Wicket Keepers in Race : भारताच्या टी-२० विश्वचषकासाठीच्या संघात यष्टीरक्षकाच्या जागेसाठी जोरदार चुरस
  • ऋजुता लुकतुके

आगामी आयपीएलमध्ये जवळ जवळ प्रत्येक संघातील यष्टीरक्षक स्वत:च्याच कामगिरीवर जास्त लक्ष ठेवून असतील. आणि संघ प्रशासनाचं नसेल तितकं लक्ष असेल भारतीय राष्ट्रीय निवड समितीचं. कारण आहे टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड, जी आयपीएलन नंतर होणार आहे. आणि सध्या यष्टीरक्षक या एका किंवा निवड समितीने दोघांची निवड करायची ठरवली तर दोन जागांसाठी जोरदार चुरस आहे. आणि आयपीएलमध्ये हे सहा खेळाडू कशी कामगिरी करतात यावर सगळ्यांचं लक्ष असेल. (Wicket Keepers in Race)

जितेश शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, रिषभ पंत आणि ध्रुव जेरेल आणि के एल राहुल हे सगळे निवड समितीच्या रडारवर असतील. के एल राहुलला आतापर्यंत निवड समितीने टी-२० सामन्यांसाठी पसंती दिलेली नाही. दक्षिण आफ्रिकेत त्याने एकदिवसीय संघाचं नेतृत्व केलं. कसोटीतही यष्टीरक्षण केलं. पण, आधीच्या टी-२० संघात तो नव्हता. तसंच रिषभ पंतही दीड वर्षांच्या दुखापतीच्या ब्रेकनंतर आयपीएलच्या निमित्ताने पुनरागमन करत आहे. पण, या दोघांची नावं मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी उमेदवार म्हणून घेतली आहेत. (Wicket Keepers in Race)

(हेही वाचा – NCP : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीवर ‘निर्णय’ घेण्यात लागणार विलंब; कारण…)

यष्टीरक्षक आणि तेज गोलंदाज आयपीएलमधूनच ठरणार

तर सध्या जितेन शर्मा आणि संजू सॅमसन हे टी-२० संघातील नियमित यष्टीरक्षक आहेत. पण, दोघांनी म्हणावी तशी सातत्यपूर्ण कामगिरी केलेली नाही. इशान किशन हा आणखी एक उमेदवार आहे. पण, त्याने मानसिक थकव्याचं कारण देत क्रिकेटमधूनच रजा घेतली आहे. पण, सलामीवीर म्हणून ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. (Wicket Keepers in Race)

अशावेळी सुयोग्य यष्टीरक्षक मिळेपर्यंत निवड समिती आणि राहुल द्रविड तसंच रोहित शर्मा सर्व पर्यायांची चाचपणी करणार हे नक्कीच. एकदिवसीय विश्वचषकानंतर भारतीय संघ फक्त ११ टी-२० सामने खेळला. यातला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा एक पावसात वाहून गेला. इतर सामन्यात खेळाडूंची म्हणावी तशी पारख निवड समितीला करता आलेली नाही. त्यामुळे आयपीएल ही आता खेळाडूंची परीक्षा असणार आहे. आणि त्यातही यष्टीरक्षक आणि एखादा तेज गोलंदाज हा आयपीएलमधूनच ठरणार आहे. आयपीएलमध्ये एकूण ७४ सामने आहेत. आणि प्रत्येकाला कमाल १८ सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. (Wicket Keepers in Race)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.