अयोध्येतील राम जन्म भूमी मंदिरात प्रभू श्री राम चंद्राच्या मूर्तीची समारंभपूर्वक प्रतिष्ठापना येत्या सोमवारी २२ जानेवारी होत असून या सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात दिवाळी साजरी केली जाणार आहे. या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या दिवशी मुंबईतील प्रत्येक घरोघरी दिवाळी साजरी व्हावी यासाठी दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्यात भाजपच्यावतीने (BJP) १ लाख १ हजार पणत्यांचे वाटप करण्यात आले आहे. शिवाय या जिल्ह्यातील सर्व मंदिरांमध्ये १०८ पणत्यांसह तेल, कापसाची वात, अगरबत्ती आणि रामाचा ध्वज अशाप्रकारे साहित्याचे वाट भाजपच्यावतीने करण्यात आले. विशेष म्हणजे या मंदिरांमध्ये सावरकर सदन आणि सावरकर राष्ट्रीय स्मारक तसेच अंदमानामध्येही दिवाळी साजरी व्हावी याकरता पणत्यांसह इतर साहित्यांचे वाटपही करण्यात आले आहे. (Ayodhya Ram Mandir)
सुमारे पाचशे वर्षांनंतर प्रभू राम चंद्रांचे अयोध्येतील (Ayodhya Ram Mandir) जन्मभूमीत मंदिराची उभारणी करून येत्य सोमवारी २२ जानेवारी रोजी प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात आहे. हा दिवस संपूर्ण देशवासियांसाठी आनंदाचा दिवस असून संपूर्ण देशात या दिवशी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले आहे. त्यानुसार संपूर्ण मुंबईत घरोघरी तसेच सोसायट्यांमध्ये प्रभू रामाचे ध्वज लावून संपूर्ण परिसर भगवामय होऊ लागला आहे. भाजप, राष्ट्रीय स्वयं संघ, विश्व हिंदु परिषद आदींच्या वतीने अक्षता वाटत तसेच पणत्यांचेही मुंबईत केले जात आहे. (Ayodhya Ram Mandir)
(हेही वाचा – Wicket Keepers in Race : भारताच्या टी-२० विश्वचषकासाठीच्या संघात यष्टीरक्षकाच्या जागेसाठी जोरदार चुरस)
पणत्यांसह या वस्तुही दिल्या जात आहेत भेट
भाजपचे दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर (Rajesh Shirwadkar) यांनी या संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक घरोघरी या दिवशी दिवाळी साजरी व्हावी यासाठी १ लाख १ हजार पणत्यांचे वाटप करण्याचा निर्धार करत पाच पणत्यांचा एक संच भेट दिली आहे. या पण त्यांच्या संचावर कुठेही पक्षाचा उल्लेख नसून या जय श्री राम असा उल्लेख आहे. या एक लाख १ हजार पणत्यांचे वाटप झाल्यानंतर आता जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर (Rajesh Shirwadkar) यांनी जिल्ह्यातील मंदिरांना भेट देऊन पणत्यांची भेट दिली आहे. (Ayodhya Ram Mandir)
याबाबत माध्यमांशी बोलतांना राजेश शिरवडकर (Rajesh Shirwadkar) यांनी २२ जानेवारी हा देशवासियांसाठी आनंदाचा दिवस आहे. हा आनंद सनातन धर्माच्या लोकांना मिळणार आहे. ४९३ वर्षांनंतर संपूर्ण देशात आनंदाचे व जल्लोष वातावरण आहे. त्यामुळे यादिवशी प्रत्येक घरोघरी दिवाळी साजरी व्हावी यासाठी १ लाख १ हजार पणत्यांचे वाटप केले आहे. भाजप, विश्व हिंदु परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेव संघाच्या राम सेवकांनी घरोघरी जाऊन या पणत्यांचे वाटप केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्येही १०८ पणत्यांसह तेल, कापसाची वात, अगरबत्ती आणि प्रभू रामाचा ध्वज भेट दिली जात आहे. काही विरोधकांनी भाजपच्यावतीने वाटण्यात येणाऱ्या पणत्यांच्या बाबती टिका करत पणत्यांसह तेलही देण्यात यावे अशी सूचना केली होती, परंतु ही सुचनाही भाजपने ग्राह्य धरत मंदिरांमध्ये दिलेल्या पणत्यांसह तेल आणि कापसाची वातही भेट म्हणून दिली आहे. अशाप्रकारे साहित्याचे वाटप करत एकप्रकारे विरोधकांचे तोंडही गप्प करण्यात आले आहे. (Ayodhya Ram Mandir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community