Vistex Asia CEO Dies : व्हिस्टेक्स एशिया कंपनीचे सीईओ संजय शाह यांचा कंपनीच्या कार्यक्रमात स्टेज पडून मृत्यू

व्हिस्टेक्स कंपनीला २५ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आणि तिथेच स्टेज कोसळून सीईओ संजय शाह मृत्यूमुखी पडले.

293
Vistex Asia CEO Dies : व्हिस्टेक्स एशिया कंपनीचे सीईओ संजय शाह यांचा कंपनीच्या कार्यक्रमात स्टेज पडून मृत्यू
Vistex Asia CEO Dies : व्हिस्टेक्स एशिया कंपनीचे सीईओ संजय शाह यांचा कंपनीच्या कार्यक्रमात स्टेज पडून मृत्यू
  • ऋजुता लुकतुके

व्हिस्टेक्स एशिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शाह यांचा हैद्राबादमध्ये एका विचित्र अपघातात मृत्यू झाला आहे. ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्या कंपनीला २५ वर्षं पूर्ण झाली. त्या निमित्ताने त्यांनी हैद्राबाद शहरात असलेल्या रामोजी फिल्मसिटीमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. सर्व कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी २ दिवसांचं हॉटेल बुकिंगही केलं होतं. पण, हा कार्यक्रम सुरू असताना अचानक स्टेजच कोसळलं. आणि यात त्यांचा मृत्यू झाला.

१८ आणि १९ तारखेला कंपनीने हा सोहळा आयोजित केला होता. यात पहिल्या दिवशी एरियल शो होणार होता. आणि कंपनीचे ७०० कर्मचारी त्यासाठी हजर होते.

‘एरियल शोसाठी खाली असलेल्या सिमेंटच्या स्टेजच्या २० फूट वर एक लाकडी स्टेज उभारण्यात आलं होतं. ६ मिलीमीटर जाडीची एक लोखंडी वायर लाकडी स्टेजच्या दोन्ही बाजूला बांधण्यात आली होती. पण, कार्यक्रम सुरू असतानाच अचानक लोखंडी दोरी एका बाजूने कापली गेली. आणि वरचं लाकडी स्टेज खालच्या सिमेंटच्या चौथऱ्यावर पडलं,’ असं एका प्रत्यक्षदर्शीने तेलंगाणा न्यूजशी बोलताना सांगितलं.

(हेही वाचा – Tata Steel Job Cut : टाटा स्टील इंग्लंडमध्ये २,८०० जणांची नोकर कपात करणार)

लाकडाचा एक मोठा तुकडा खाली स्टेजवर बसलेले संस्थापक आणि सीईओ संजय शाह तसंच कंपनीचे अध्यक्ष विश्वनाथराज दातला यांच्यावर पडला. दोघांनाही गंभीर दुखापतींनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, शाह यांचा शनिवारी मृत्यू झाला. तर दातला हे अजूनही गंभीर अवस्थेत आहेत.

रामोजी फिल्म सिटीची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी उषाकिरण इव्हेंट्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय शाह हे मूळचे मुंबईचे आहेत. आणि १९९९ मध्ये त्यांनी व्हिस्टेक्स एशिया ही महसूल व्यवस्थापन कंपनी स्थापन केली होती. सध्या ते अमेरिकेत इलिनॉईस राज्यात राहत होते. कंपनीला २५ वर्ष पूर्ण होत असल्यामुळे ते खास कार्यक्रमासाठी भारतात आले होते. सध्या या कंपनीचा टर्नओव्हर ३०० दशलक्ष अमेरिकन डॉलर इतका होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.