Australian Open 2024 : महिलांमध्ये अव्वल खेळाडू इगा स्वियातेकला पराभवाचा धक्का

या पराभवापूर्वी इगा स्वियातेक सलग १८ सामने जिंकली होती.

290
Australian Open 2024 : महिलांमध्ये अव्वल खेळाडू इगा स्वियातेकला पराभवाचा धक्का
Australian Open 2024 : महिलांमध्ये अव्वल खेळाडू इगा स्वियातेकला पराभवाचा धक्का
  • ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत यंदाचा पहिला मोठा धक्कादायक निकाल शनिवारी नोंदवला गेला आहे. महिलांमध्ये अग्रमानांकित आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असलेली खेळाडू इगा स्वियातेकला मानांकनही नसलेल्या लिंडा नोसकोवाने तिसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का दिला आहे. पोलिश स्टार खेळाडू इगाने पहिला सेट ६-३ असा आरामात जिंकला. पण, त्यानंतर मात्र अचानक तिच्या खेळात मरगळ आली. आणि उलट लिंडाने आपला धडाका सुरू केला. पुढचे दोन सेट ६-३, ६-४ असे जिंकत २ तास ४० मिनिटं चाललेल्या सामन्यात तिने विजयही मिळवला. (Australian Open 2024)

ऑस्ट्रेलियन ओपनचा पहिला आठवडा आता संपलाय. आणि विशेष म्हणजे महिलांमध्ये पहिल्या १० पैकी फक्त ३ सिडेड खेळाडू ड्रॉमध्ये शिल्लक आहेत. (Australian Open 2024)

(हेही वाचा – Eknath Shinde: स्मार्ट सिटी उभारणीसाठी दावोस येथे करार, आदर्श विकास केंद्र उभारण्याचा एमएमआरडीएचा मानस)

‘मला काय बोलायचं सुचत नाहीए. माझी ही पहिलीच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा आहे. हा सामना रंगतदार करेन इतकाच विचार मी केला होता. पण, मी विजयी होईन, असं नव्हतं वाटलं,’ असं नोस्कोवाने सामन्यानंतर बोलून दाखवलं. २२ वर्षीय पोलिश खेळाडू स्वियातेक हा सामना खेळण्यापूर्वी दुसऱ्या फेरीत तीन सेटच्या दिव्यातून गेली होती. तिथे पहिला सेट गमावून सामना तिने जिंकला होता. (Australian Open 2024)

पण, पिछाडीवर आघाडी घेण्याची किमया ती यावेळी करू शकली नाही. लिंडासमोर तिची सर्व्हिस कमी पडली. दोन्ही सेटमध्ये सुरुवातीला तिची सर्व्हिस भेदली गेली. आता लिंडा नोवोस्कीची गाठ सोमवारी १९ वी सिडेड एलिना स्वितोलिनाशी पडणार आहे. (Australian Open 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.