अयोध्येत उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात (Ayodhya Shri Ram Mandir) सोमवारी, २२ जानेवारी रोजी बालस्वरूप रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्याआधी रामललल्लाच्या त्या सुंदर मूर्तीचे छायाचित्र समोर आले आहे. हे छायाचित्र पाहून हिंदू भक्तिमय झाले आहेत. ही मूर्ती साकारणारे कर्नाटकचे शिल्पकार अरुण योगीराज यांचे यानिमित्ताने कौतुक होत आहे.
मूर्तीकार अरुण योगीराज सहा महिने सात्विक आहारावरच होते
अरुण योगीराज हे म्हैसूरचे रहिवासी आहेत. उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरू शंकराचार्यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. ती प्रतिमा अरुण योगीराज यांनी बनवले होते. तर दिल्लीच्या इंडिया गेटवर पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे शिल्पही अरुण योगीराज यांनी साकारले आहे. आता अरुण योगीराज यांनी बनवलेली रामललाची मूर्ती अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरातील (Ayodhya Shri Ram Mandir) गर्भगृहात बसवण्यात येणार आहे. ही मूर्ती साकारताना अरुण योगीराज हे सात्विक आहारावरच होते, त्यांच्या डोळ्यालाही जखम झाली होती.
मूर्ती दगड दक्षिण भारतातील सर्वात जुन्या दगडांमधून बनवली
या काळात योगीराज हे तब्बल सहा महिने कुटुंबीयांनाही भेटले नाहीत. अरुण योगीराज हे मूर्ती बनण्याआधी दिवसाची सुरुवात अयोध्येत आपल्या कुलदैवतेच्या पूजेने करत असे. यानंतर ते तेथील पंडितांच्या पूजेत भाग घेत असत. रामकथेच्या अभ्यासकांनी त्यांना मदत केली, श्रीराम कसा दिसतो आणि सामान्य लोक श्रीरामामध्ये काय पाहतात हे सांगितले. मूर्ती बनवत असताना अरुण योगीराज यांच्या डोळ्यांत दगडाचा धारदार तुकडा घुसला. यानंतर योगीराज यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तरीही योगीराज यांना रामललाची भव्य मूर्ती साकारण्यापासून कोणीही रोखू शकले नाही. अरुण योगीराज यांनी 2008 मध्ये म्हैसूर विद्यापीठातून एमबीए केले आहे, परंतु त्यांनी एका खाजगी कंपनीतील नोकरी सोडून कौटुंबिक व्यवसाय निवडला. रामलल्लाची मूर्ती बनवण्यासाठी म्हैसूरच्या गुज्जे गौडना पुरा येथील एका ठिकाणाहून दगड आणण्यात आला होता, जिथून रामललाची मूर्ती कोरण्यात आली आहे. हा दगड दक्षिण भारतातील सर्वात जुन्या दगडांपैकी एक आहे.
Join Our WhatsApp Community