अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रविवारी नागपुरातील बजाजनगर परिसरातील बास्केटबॉल मैदानावर 4 हजार चौरस फुटांची महारांगोळी साकारली जाणार आहे. संस्कार भारती, आयपीएएफ, उत्तीष्ठ भारत आणि सिद्धिविनायक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही महारांगोळी (Maharangoli) साकारण्यात येणार आहे.
संस्कार भारतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत घरोटे यांच्या मार्गदर्शनात हर्षल कावरे, मोहिनी माकोडे, दीपाली हरदास यांच्यासह एकूण 100 कलाकार यात सहभागी होणार आहेत. ही रांगोळी 50 बाय 80 फूट अशी एकूण 4 हजार चौरस फूट आकारातील असून संस्कार भारतीचे कलावंत ती दुपारी 3 ते रात्री 9 या 6 तासात पूर्ण करणार आहेत. या ऐतिहासिक क्षणी अध्यक्षस्थानी प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने तसेच, श्री सिद्धीविनायक सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप जोशी, इंटरनॅशनल परफॉर्मिंग आर्ट फेस्टिव्हलचे सीईओ श्याम पांडे उपस्थित राहणार आहेत.
22 आणि 23 जानेवारीला महारांगोळी…
ही महारांगोळी 22 आणि 23 जानेवारी असे 2 दिवस सर्व नागरिकांना बघण्याकरिता खुली राहणार आहे. यात अयोध्या मंदिराची प्रतिकृती, अक्षत कलश यात्रा, राम सीता, हनुमानजी, धनुष्यबाण, रामजी झुला, राम सेतूचा राम नावाचा दगड आदी प्रतिकृती बघायला मिळणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community