एकीकडे उत्तर भारतात थंडीची लाट कायम असतानाच दुसरीकडे मात्र पावसाची (Weather Update) शक्यता वर्तवण्यात आली आहे. राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील भागात दाट धुक्यासह थंडीचा कडाका वाढला आहे. धुक्यामुळे दुष्यमानता कमी झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे काही राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने देशात विविध ठिकाणी कडाक्याच्या थंडीचा इशारा दिला आहे.
(हेही वाचा – Ayodhya Shri Ram Mandir : अयोध्येत श्रीराम मंदिरात स्थापन होणाऱ्या बालस्वरूप रामललाच्या मूर्तीची निर्मिती कशी झाली?)
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात येत्या काही दिवसात थंडीचा जोर (Weather Update) ओसणार असून पावसाची शक्यता आहे.
पुन्हा अवकाळी पावसाचे संकट –
विदर्भात येत्या काही दिवसात हलक्या पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा (Weather Update) अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवसात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते.
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: राम मंदिर आधुनिक भारताचा सौहार्द संस्कृती सेतू !)
शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ –
मागील काही दिवसांपासून राज्यासह नाशिक आणि निफाडमध्ये तापमानात (Weather Update) चढउतार पाहायला मिळत आहे. अशातच काही दिवस ढगाळ वातावरणामुळे थंडीच्या प्रमाणात काहीशी घट झाली होती. पण आता पुन्हा थंडी वाढली आहे. हरभरा, गहू या पिकांना जरी या थंडीचा फायदा होत असला तरी मात्र या थंडीने फळबगांसह द्राक्षपिकांच्या वाढीवर परिणाम होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Weather Update)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community